बुधवार, १६ जुलै, २००८

अननसाचे रायते अर्चना कामत शनि, ०२/०६/२००७ - ११:४३.

वाढणी:१० माणसांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ अननस
१ कप साखर
पाव कप पाणी
१/२ किलो घट्ट दहि
पाव चमचा चाट मसाला
क्रमवार मार्गदर्शन:अर्धे अननस बारीक चिरून घ्यावे. अर्धे अननस मिक्सरमधून पल्प करून घ्यावे. पाण्यात साखर घालून १ उकळी आणून विरघळवून घ्यावी. त्यात पल्प व अननसाचे तुकडे घालून एकत्र ढवळून घ्यावे. विस्तव बंद करणे. थंड झाल्यावर फेटलेले दहि घालून फ़्रिजमध्ये थंड करण्यास ठेवणे. वाढताना वरून चाट मसाला घालून वाढणे.
माहितीचा स्रोत:हि माझी स्वतःची पाककृति आहे.
अधिक टीपा:
चाट मसाला न घालता वरून चार केशराच्या काड्या घातल्यास स्विट डिश म्हणून वापरता येते। शिवाय आंब्याच्या दिवसात अननसाच्या ऐवजी आंब्याचा वापर करावा.
हे मनोगत वरुण घेतले आहे.