मंगळवार, २२ जुलै, २००८

तोंडली-भात संवादिनी गुरु, २७/०४/२००६ - १४:१५.

वाढणी:२ जण
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी तांदुळ,१ वाटी उभी पातळ चिरलेली तोंडली
फ़ोडणी - १ १/२ टे‌. चमचा तेल,१/४ छोटा चमचा मोहरी,६/७ पाने कढीपत्ता
२ वाट्या पाणी,१/४ छोटा चमचा हळद,मीठ चवीप्रमाणे
२ चमचे गोडा मसाला
क्रमवार मार्गदर्शन:
१.तांदुळ धुवून निथळावेत.
२. लहान कुकरात तेल तापल्यावर मोहरी,कढीपत्ता घालावा.मोहरी तडतडल्यावर त्यावर तोंडली घालून २ मिनिटे परतवावीत.
३.त्यावर तांदुळ,हळद व गोडा मसाला घालुन १ मिनिट परतवावेत.
४. नंतर त्यात पाणी व मीठ घालून सर्व ढवळावे आणि ३ शिट्ट्या काढाव्यात.
माहितीचा स्रोत:स्वयंपाकघरातले प्रयोग
अधिक टीपा:चविष्ट आणि पटकन होतो।
हे मनोगत वरुण घेतले आहे.