सोमवार, २८ जुलै, २००८

चॉप्स फ़्राय

वाढणी:४ जणांसाठी.
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१५ मटण चॉप्स.
२ चमचे आलं, लसुण पेस्ट
१ चमचा हळद.
१ १/२ चमचा मसाला.
२ अंडी
चवी नुसार मीठ
तेल
३-४ चमचे लिंबाचा रस
क्रमवार मार्गदर्शन:
मटण चॉप्स स्वच्छ धुऊन त्याला हळद, मीठ लिंबाचा रस लावून ५-१० मिनिट ठेवावं. नंतर चॉप्सना सुटलेलं पाणी फेकून द्या. आलं, लसुणाची पेस्ट आणी मसाला लावून १/२ तास मुरण्यास ठेवावे. १/२ तासा नंतर हे चॉप्स कुकरला लावून उकडून घ्या. (३ शिट्ट्या पुरेश्या होतात.)(कुकरला लावताना कुकरमध्ये एक भांड्यावर जाळी (चाळणी) ठेवून त्यावर चॉप्स रचावे)अंडी चांगली फेटून घ्या. फ़्रायपॅनला तेल लावून गॅस वर तापत ठेवा.प्रत्येक चॉप फेटलेल्या अंड्यात बुडवून मध्यम आचेवर चॉप्स 'मध्यम आंचेवर परतून घ्या.वाढताना थोडं लिंबू पिळून वाढावे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.