मंगळवार, १५ जुलै, २००८

गाजराच्या वड्या माला शुक्र, १८/०१/२००८ - १२:३३.

वाढणी:ते तूमच्यावरच आहे
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
2 वाट्या गाजराचे छोटे-छोटे तुकडे
1/2 वाटी खवा
पाव आटी दूध
2 वाट्या साखर
वेलदोडेची पूड, काजू-बादामचे काप, तूप.
क्रमवार मार्गदर्शन:
१ चमचा तुपावर गाजराचे तुकडे वाफवून घ्यावे. नंतर वाफवलेल्या तुकड्यांचा गोळा करून घ्यावा.
वाफवलेल्या गोळ्यात दूध, खवा टाकून एकत्र शिजवावे. थोडं शिजत आल्यावर साखर घालून व्यवस्थित शिजवून घ्यावे. मिश्रण घट्ट होत आले की वेलदोड्याची पूड घालून ते एकजीव करावे. नंतर ताटाला तूप लावून मिश्रण ओतावे व वड्या कापाव्यात. वरून काजू व बदामाचे काप पेरून वड्यांना सजवावे.
धंन्यवाद,
माहितीचा स्रोत:मिडीया
अधिक टीपा:गाजरा एवजी दुधी किंवा पपईचा वापर करून पहा
हे मनोगत वरुण घेतले आहे.