सोमवार, २१ जुलै, २००८

नारळीभात साक्षी गुरु, १०/०८/२००६ - १२:०७.

वाढणी:२ जणांना भरपूर
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
तांदूळ दीड वाटी
लवंगा ४-५
गूळ दीड वाटी (तांदूळाइतका)
खोवलेले खोबरे १ मोठी वाटी
तूप १ मोठा चमचा
आधण पाणी ३ वाट्या (तांदळाच्या दुप्पट)
क्रमवार मार्गदर्शन:
तांदूळ धुऊन खळखळीत वाळवावे. एका पातेल्यात तूप घेऊन तापल्यावर त्यात लवंगा घालाव्या व तांदूळ घालावे. तांदूळ चांगले भाजून झाले की आधण पाणी ओतावे. भात थोडासा फडफडीत शिजवावा. कुकरला लावूनही चालेल.
एका पातेल्यात गूळ घेऊन गूळ पातळ झाला की त्यात खोवलेले खोबरे घालावे. खोबरे शिजले की त्यात भात मिसळावा. भाताची शिते मोडू नयेत म्हणून उलथन्याच्या मागच्या बाजूने भात परतावा.
आवडत असल्यास वरून काजू, बदाम यांचे काप, वेलेदोड्याची पूड घालावी.
माहितीचा स्रोत:सौ आई
अधिक टीपा:घाईत लिहिले असल्याने चुका राहण्याची शक्यता आहे।
हे मनोगत वरुण घेतले आहे.