सोमवार, २१ जुलै, २००८

राईस क्रिस्पचा चिवडा जान्हवी देशपांडे रवि, १०/०९/२००६ - १९:३२.

वाढणी:२-३
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
केलॉग्सचे किंवा कोणतेही बिनासाखरेचे(गोड चिवडा आवडत असल्यास गोड )राईस क्रिस्प सिरियल
फोडणीसाठी २-३ चमचे तेल
मोहरी,जीरे, तीळ, कढीपत्ता, किसमीस, शेंगादाने किंवा काजु
चवी नुसार तिखट, मीठ
हळद, हिंग
लिंबूसत्व चिमूटभर
क्रमवार मार्गदर्शन:
फ़ोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी,जीरे, तीळ, कढीपत्ता, किसमीस, काजू,हळद, हिंग,चवी नुसार तिखट, मीठ,लिंबूसत्व टाकणे.
फोडणी थोडी गार करावी,(नाहीतर राईस क्रिस्प अगदी चपटे होतात) त्यात राईस क्रिस्प टाकुन परतावे . झाला कुरकुरीत कमी तेलाचा खमंग चिवडा तयार ;-)
माहितीचा स्रोत:नणंद आणि स्वानुभव
अधिक टीपा:कमी वेळात, कमी तेलात पौस्टीक चिवडा तयार होतो।
हे मनोगत वरुण घेतले आहे.