मंगळवार, २२ जुलै, २००८

कटलेट (भाज्यांचे) किर्ती शुक्र, १४/०४/२००६ - ११:४४.

वाढणी:२ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ बटाटे (ऊकडलेले) , १ गाजर (किसलेले), १ बीट (कीसलेले)
२ मिरच्या (बारीक चिरलेल्या), १ वाटी मटार (वाफ़वलेले), १/२ वाटी ब्रेडचा चुरा
आलं-लसुण (बारीक चिरलेले), मीठ, तिखट.
क्रमवार मार्गदर्शन:
ऊकडलेला बटाटा, गाजर, बीट, मिरची, मिठ,तिखट, मटार, आलं लसुण आणि ब्रेडचा चुरा एका पातेल्यात एकत्र करुन मळून घ्यावे.
हव्या त्या आकाराचे कटलेट हातावर बनवून घेणे आणि फ़्राईंग पॅन मधे थोड्याश्या तेलावर दोन्हीबाजूने खमंग तळणे.
टॉमेटो सॉस अथवा हिरवी चटणी बरोबर खावे.तसेच पावात घालुनही छान लागते.
माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:
कटलेट मधे मटार न वापरता भिजवून शिजवलेले हिरवे वाटाणे वापरले तर जास्त छान लागतात.
आवडत असल्यास इतर भाज्या जसे- कोबी, फ़्लॉवर इ.घालाव्यात.
बीट ऊकडवून न किसता कच्चेच किसावे.
उत्तम चवीसाठी आलं-लसुण भरपूर वापरावे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.