शुक्रवार, १८ जुलै, २००८

उकड-प्रकार २ स्वाती दिनेश मंगळ, ०५/१२/२००६ - ०७:०२.

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी तांदुळाचे पीठ,आंबट ताक १ मोठा ग्लासभरून,१ कांदा,२,३ लसूण पाकळ्या,थोडे आले
तेल,मोहरी,हिंग,१,२ हिरव्या मिरच्या,कढीपत्ता,मीठ,साखर
क्रमवार मार्गदर्शन:तांदुळाचे पीठ ताकात पातळसर भिजवून घ्या,गुठळ्या मोडा, त्यात मीठ व किंचीत साखर घाला.कांदा चौकोनी चिरा,लसूण पाकळ्यांचे उभे पातळ काप करा.आल्याचेही उभे पातळ काप करा.तेल गरम करा,त्यात मोहरी घाला,तडतडली की हिंग,कढीपत्ता,मिरच्या घाला.कांदा व लसूण घाला,झाकण ठेवून २ वाफा येऊ द्या. नंतर तांदुळाचे ताकात भिजवलेले पीठ घाला, ढवळा.झाकण ठेवून २,३ वाफा येऊ द्या.शिजली की खोलगट बशीत वाढून आळे करून त्यात कच्चे तेल घाला. गरम गरम खा.
माहितीचा स्रोत:माझी आई
अधिक टीपा:आताच रोहिणीची उकड वाचली आणि आठवण झाली,म्हणून मनोगतींसाठी इथे ही पण एक उकड पाकृ देत आहे।(या प्रकारात हळद घालत नाहीत व कांदा,लसूण शिजताना घालतात.)
हे मोगत वरुण घेतले आहे.