मंगळवार, २२ जुलै, २००८

बोगदा

परवा पुण्याहून मुंबईला येत होतो। बरेचवेळा वाचलेली पाटीच परत वाचली.' बोगदा पुढे आहे.' नेहमीप्रमाणेच खटकले, असं का लिहिलाय ? 'पुढे बोगदा आहे' असं का नाही ?मग आठवलं, दादांच्या 'पांडू हवालदार' च्या टायटल्स् दाखवताना अशीच मजा केली होती.पांडू हलवादार - दांडू हलवापार वगैरे वगैरे. म्हणून या वाक्याचं पण असेच करुन पहावे असं मनांत आलं.

बोगदा पुढे आहे.

बोगदा आहे पुढे.

पुढे बोगदा आहे.

पुढे आहे बोगदा.

आहे पुढे ,बोगदा.

आहे बोगदा पुढे.

सरकारी खात्यातल्या लोकांना कुठला पर्याय योग्य वाटेल ?

हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.