मंगळवार, १५ जुलै, २००८

उखरी नीला निलेश कौठेकर सोम, २२/१०/२००७ - २१:०६.

वाढणी:२
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
कणीक- १ कप
तेल -३ चमचे
मीठ -१/२ चमचा
क्रमवार मार्गदर्शन:

1. कणकेत तेल आणि मीठ टाकून घट्ट मळून घ्या.
2. १०-१५ मिनिट भिजू द्या.
3. एक सारखे गोल गोळे तयार करून घ्या.
4. हे गोळे हाताने थापून उखरी करा.
5. उखरी भाकरी एवढी जाड ठेवा.
6. Oven मध्ये Broll वर भाजून घ्या.
7. पहिली बाजू झाल्यावर पालटून दुसरी बाजू करा.
8. Oven नसल्यास कोळशाच्या शेगडीवर भाजा.
माहितीचा स्रोत:माझी आजी
अधिक टीपा:
उखरी आंबट वरणासोबत छान लागते. लहान मुलांना गरम असताना तूप लावून खायला देता येते. माझी आजी द्यायची.
हे मनोगत वरुण घेतले आहे.