शनिवार, २६ जुलै, २००८

यडा मका अर्थात क़ेझी कॉर्न

वाढणी:२
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
अमेरिकन गोड मका (कोवळे कणसाचे दाणे- बाजारात मिळणारे)-३ वाट्या
अमुल बटर- १ टेबलस्पुन
चाट मसाला- १ टिस्पुन
मिरेपुड -१/२ टिस्पुन
क्रमवार मार्गदर्शन:
थोडे पाणी ( मक्याचे दाणे बुडतील ईतकेच) घालुन मका शिजत ठेवावा. ५ मिनीटानी त्यात अमुल बटर, चाट मसाला, मिरेपुड या इतर वस्तु घालाव्यात. अजून ५-७ मिनीटे शिजवावे. नन्तर गरम गरम खावे. हा अतिशय सोपा आणि चवदार पदार्थ आहे.
विशेष सूचनाः
१. एकदा खायला सुरुवात केल्यावर थांबता येत नाही.
२. कितीही जास्त प्रमाणात केला तरी जरा कमीच पडतो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.