मंगळवार, १५ जुलै, २००८

खजूर केक मन्जुशा शनि, ३०/०६/२००७ - १२:४४.

वाढणी:४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
खजूर १ कप, २ वाट्या मैदा, १ कप साखर, १ कप रिफाईंड तेल
१ १/२ कप दूध, १ चमचा सोडा , चिमूटभर मीठ व १ चमचा व्हॅनिला इसेन्स
क्रमवार मार्गदर्शन:एक कप दुधात बिनबियांचा खजूर अर्धा तास भिजत ठेवा.मैदा, मीठ व सोडा एकत्र चाळून घ्या.केकपत्राला तेल लावून ठेवा. एका भांड्यात तेल व पिठीसाखर फेटून घ्या त्यात दुधात भिजवलेला खजूर घालून २ मि. फेटा. त्यात थोडा-थोडा मैदा टाकून मिसळत जा. त्यात उरलेलं दूध घालून १ मि. फेटा. केकपात्रात मिश्रण ओतून ६०% पॉवर (५४०) १० मि.अतिसुक्ष्मलहर भट्टीत भाजून घ्या. किंवा आधी गरम केलेल्या ओव्हन मध्ये १८० डिग्री तापमानावर ३० मि. बेक करा.
माहितीचा स्रोत:माझी बहीण रंजना
अधिक टीपा:खास शाकाहारी केक। आपल्या आवडीप्रमाणे आयसिंग करुन सजवा.
हे मनोगत वरुण घेतले आहे.