शनिवार, २६ जुलै, २००८

गाजराच भरीत अस्मिताकुलकर्णी मंगळ, २२/०७/२००८ - ०३:१९.

वाढणी:२
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
४ गाजरं
३ हिरव्या मिरच्या
१ काडी कढिपत्ता
कोथिंबिर
हिंग , मोहरि, जिरे
दही
क्रमवार मार्गदर्शन:
गाजर धुवून साल काढुन, कुकर मध्ये एका ताटली मध्ये ठेवून उकडुन घ्या.
मग हाताने कुस्करून घ्या.
त्यावर मिठ , साखर घाला .
कढल्यामध्ये चमचा भर तेल घाला, गरम झाल्यावर मोहरी घाला, जिरे , हिंग मिरचिचे तुकडे , हळद घाला
हि फोडनी कुस्करलेल्या गाजरावर घाला. एकत्र करा.
थंड झाल्यावर दही किवा लिंबू पिळा. वरून बारिक चिरलेली कोथिंबिर घाला.
रुचकर भरित तयार
माहितीचा स्रोत:आजे सासुबाइ
अधिक टीपा:साखर जरा मोथ्य हाताने घाला । आंबट गोड छान लागते भरीत....
हे मनोगत वरुण घेतले आहे.