मंगळवार, २२ जुलै, २००८

कळण रोहिणी गुरु, १६/०२/२००६ - २३:३०.

वाढणी:१ जण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
कोणतेही एक कडधान्य १ वाटी
फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे,
तिखट अगदी थोडे चवीपुरते
साखर व मीठ चवीपुरते
कोथिंबीर थोडी, १ मिरची
आंबट ताक अर्धी वाटी
क्रमवार मार्गदर्शन:
कोणतेही एक कडधान्य १ वाटी (किंवा २-३ कडधान्य मिळून १ वाटी) रात्री पाण्यात भिजत घालणे. सकाळी पाणी निथळण्यासाठी चाळणीमधे ओतणे. त्यावर झाकण ठेवणे.
सकाळी किंवा रात्री कळण करायचे असेल तर आधी कूकर मधे एका पातेल्यात हे कडधान्य शिजवून घेणे. शिजवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त पाणी घालणे. शिजवल्यावर हे जास्तीचे पाणी एका पातेल्यात घेणे. समजा हे पाणी २ वाट्या असेल तर आंबट ताक अर्धी वाटी घालणे. ताकाचे प्रमाण जास्त नको, नाहीतर कडधान्याच्या पाण्याचा स्वाद लागणार नाही.
नंतर वरुन फोडणी घालणे. (फोडणीमधे हळद कमी प्रमाण) नंतर त्यात चवीप्रमाणे तिखट, १ मिरची (२-३ तुकडे करुन), मीठ व साखर घालून एक उकळी आणणे. थोडी कोथिंबीर चिरून घालणे.
हे कळण नुसते प्यायचे असते, ज्याप्रमाणे टोमॅटो सूप किंवा सार पितो त्याप्रमाणे. गरम/गार कसेही चांगले लागते.
रोहिणी
माहितीचा स्रोत:सौ आई
हे मनोगत वरुण घेतले आहे.