मंगळवार, २२ जुलै, २००८

कांदा पराठा माधवी घरडे गुरु, २३/०२/२००६ - १२:१२.

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
भिजवलेले कणिक(आधिच पोळिकरता भिजवलेले कणिक असलेली चालेल),कांदा बारिक चिरलेला (१ कांदा) ,१ हिरवी मि
चविपुरते मीठ,थोडे तेल
क्रमवार मार्गदर्शन:
भिजवलेल्या कणकेचा पोळिकरता लागेल एवढे दोन गोळे करणे,त्यानंतर ते थोडे लाटुन घेणे(आपण तेलाचि पोळिकरतांना लाटतो तेवढि). मग त्यावर बारिक चिरलेला कांदा टाकणे व हिरवी मिरची बरिक कापून त्यावर टाकणे थोडे जिरे व मीठ टाकणे दुसरी पाति त्यावर लावून लाटणे .अश्या प्रकारे लाटावे की कांदा दुस-या पातीवरुन वर येईल.कांदा वर दिसल्यास फ़ारच चांगले.मग तो पराठा तव्यावर टाकुन चांगले तेल लावुन भाजणे.आणि गरम गरम वाढणे.
हा अतिशय लवकर होणारा पदार्थ आहे.
अधिक टीपा:ह्या पराठ्याबरोबर टमाटर चटणी वाढता येइल।किंवा दहि असल्यास अति उत्तम. नव-याला सकाळी ऑफ़िसमध्ये जातांना देता येईल.
हे मनोगत वरुण घेतले आहे.