शुक्रवार, १८ जुलै, २००८

मोगरा सरबत

मोगरा सरबत
प्रेषक संतोष जोशी ( शुक्र, 07/11/2008 - 18:58) .
नमस्कार,साहित्य :पाव किलो मोगर्‍याच्या ताज्या कळ्या,५ लिटर पाणी ,अर्धा किलो साखर , चिमूटभर मीठ.
कॄति :मोगर्‍याच्या कळ्या थंड पाण्यात स्वच्छ धुवून घेणे।५ लिटर पाणी उकळण्यास ठेवा , चांगले उकळले की त्यात साखर घालून अजुन २० मि. उकळवावे.चिमूटभर मीठ घालून पाणी गाळून घ्यावे.पूर्णं थंड झाल्यावर त्यात मोगर्‍याच्या कळ्या घालून झाकण ठेवून २ तास ठेवावे.परत एकदा पाणी ५ मि. उकळवून घ्यावे ( फुलं काढून घेउन )थंड झाल्यावर परत एकदा फुलं त्यामधे घालून अजून २ तास ठेवावे.नंतर फुलं काढून टाकावी आणि गाळून एका बाटलीत भरुन फ्रीजमधे ठेवावे.सर्व्ह करते वेळेस १ : २ भाग थंड पाणी मिक्स करून सर्व्ह करावे.
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.