सोमवार, २१ जुलै, २००८

झटपट आमटी वा डाळीचे पराठे अनुजा कुलकर्णी मंगळ, १५/०८/२००६ - २३:३५.

वाढणी:३-४
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१-१.५ वाटी आमटी अथवा दाल फ्राय (१ दिवस शिळं असेल तरी चालेल/पळेल)
३-३.५ वाट्या कणीक
३-४ चमचे डाळीचं पीठ (बेसन)
चवीनुसार मीठ, धने-जीरे पूड
क्रमवार मार्गदर्शन:
वरील जिन्नस एकत्र करून पोळीच्या कणकेप्रमाणे भिजवावे.
गरजेनुसार पाणी व हवे असल्यास तेलाचा हात लावावा.
गरम गरम पराठे लोणचे/चुंदा/चटणी सोबत खावे.
सुट्टीच्या दिवशी उशिरा उठल्यावर नाश्त्यासाठी पटकन तयार होतात.

माहितीचा स्रोत:सासुबाई उर्फ काकू - सौ. अपर्णा कुलकर्णी
अधिक टीपा:
पराठ्याला पापुद्रे सुटण्यासाठी युक्तीः
पोळीपेक्षा मोठा गोळा घेऊन छोटी पोळी लाटावी.
या छोट्या पोळीत एका त्रिज्ये एवढी (radius) सुरी/चमच्याने भेग करावी.
याचा द्रोण करून तो चपटा करावा, मग पराठा लाटावा.
द्रोण करताना जितके स्तर (layers) येतात, तितके पराठ्याला पापुद्रे छान सुटतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.