मंगळवार, २२ जुलै, २००८

भाताची भेळ किर्ती गुरु, २६/०१/२००६ - ०१:००.

वाढणी:२ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ वाट्या शिजवलेला बासमती भात (शिळा असेल तर उत्तम)
१ कांदा (बारीक चिरलेला)
१ टॉमेटो (बारीक चिरलेला)
कोथींबीर (बारीक चिरलेली)
अर्धा लिंबूचा रस , लसूण (बारीक चिरलेली), मीठ
फ़ोडणीचे साहित्य
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम भात शीजवून घ्यावा आणि थोडा मोकळा होवू द्यावा.
मोहरी, जिरे, हळद आणि लसूण घालून फ़ोडणी करावी आणि ती त्या भातावर घालावी...(थोडक्यात ..फ़ोडणीचा भात करावा)
ह्या भातात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो,कोथींबीर, लिंबूचा रस आणि मीठ घालून एकत्र करावे.
आवडत असल्यास शेंगदाणे व चाट मसाला घालावा.
शेंगदाणे फ़ोडणीत घालवेत म्हणजे कच्चे लागणार नाहित।
हे मनोगत वरुण घेतले आहे.