सोमवार, २८ जुलै, २००८

कांद्याचा पराठा !

वाढणी:आवडीनी खाणार्यानसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
कणीक, कांदे २, चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ, कोथिंबीर.
क्रमवार मार्गदर्शन:
पोळीसाठी मळतो तशी कणिक मळुन घ्यायची.
सारणःकांदे पातळ उभे चिरुन घ्या. त्यात तिखट, मिठ, कोथिंबीर घालुन थोड्या तेलात परतुन घ्यावे. सारण गार झाले की पुरणाच्या पोळीत पुरण भरतो तसे भरावे. आणि लाटावे व नेहमीचे पराठे भाजतो तसे तेल टाकुन भाजावे. कांदा पोळी लाटताना थोडा बाहेर येतो, तो येऊ द्यावा, तो तव्यावर भजला गेल्यामुळे मस्त स्वाद लागतो.गरम गरम पराठ्यावर मस्त साजुक तुप घालुन फ़स्त करावा... आपण खुष .. कारण करायला सोप्पा आणि घरातले पण खुष..
प्राजक्त

माहितीचा स्रोत:खवय्यांकडुन समजले
हे मनोगत वरुण घेतले आहे.