रविवार, २७ जुलै, २००८

भाज्यांची भजी

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
कोबी, गाजर, मटार, सिमला मिरची, श्रावणघेवडा
हिरव्या तिखट मिरच्या
लिंबू अर्धे, मीठ
डाळीचे पीठ
तांदुळाचे पीठ
तळण्यासाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:
वरील सर्व भाज्या खूप बारीक चिरणे. प्रत्येक बारीक चिरलेली भाजी १ वाटी घेणे व मटारचे दाणे १ वाटी. ५-६ हिरव्या मिरच्या आधी उभ्या व नंतर आडव्या बारीक चिरणे. हे सर्व एका पातेलीमधे घालून त्यात चवीप्रमाणे लिंबू व मीठ घालणे. नंतर त्यात डाळीचे पीठ जास्त आणि तांदुळाचे पीठ थोडेसे घालून पीठ भिजवणे. हे पीठ नेहमीच्या भज्यांप्रमाणे पाणी घालुन भिजवायचे नाही. हे पीठ भिजवताना मिळून आले नाही तर थोडेसे पाणी घालायला हरकत नाही.
भिजवलेले हे पीठ मुठीत घेउन २-३ वेळा दाबून (लाडू वळतो तसे) तेलात सोडून तळावेत। लांबटगोल आकार द्यावा.
हे मनोगत वरुघेतले आहे.