मंगळवार, २२ जुलै, २००८

शाही काजु पनीर मनिशा खाडे गुरु, ०९/०३/२००६ - ०५:३९.

वाढणी:४ जणांसाठि
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
ओले काजू पाऊण वाटी / (भिजवलेले सुके कजु), २०० ग्रॅम पनीर,
बारीक चिरलेला कांदा, दोन मसाला वेलची, २ तमालपत्र, दही १/२ वाटी
टोमॅटो ४-५ बारिब पेस्ट (गाळुन), काश्मीरि मिरची पावडर, गरमा मसाला २ चमचे
दालचिनि पावडर१ १/२ चमचा, धणे पावडर १ चमचा, आलं-लसुन पेस्ट २ चमचा,
मीठ, १ वाटी तेल. ई.
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम पॅन मध्ये (नोनस्ट्क) तेल घालावे. तेल गरम झाल्यानंतर त्यात तमालपत्र, वेलची & नंतर कांदा घालावा.कांदा गुलाबि रंगावर आल्यावर त्यात टोमॅटोची पेस्ट टाकावी. पेस्ट तेल सुतेपर्यंत भाजावी. जळु देउ नये.मिश्रण अधुन -मधुन हलवत रहावे. चांगले तेल वरती आले कि त्यात गरम मसाला, धणे , दालचिनी पावडर, आलं-लसुन पेस्ट टाकून चांगले हलवावे. वरती तेल यायला लागले कि त्यात लाल मिरचि पावडर टाकावी. काजु टाकावेत. दही पाणी न घालता फ़ेटावे. व त्यात टाकावे. झाकण लावावे. एक वाफ़ देऊन त्यात १ वाटी पाणी ओतावे. (थोडे जास्त हि चालेल पण पाणी अति ओतु नये. कारण हि भाजी पातळ झाल्यास चांगलि लागत नाही.)
भाजी शिजत आल्यावर त्यात पनीर घालावेत. आणखी एक वाफ़ आणावी. मस्त अशी ग्रेव्ही तयार होईल. भाजी तय्यार!!
वरुन कोथंबिर पेरावी. कि बस्स.....
हि भाजी नान, मस्का रोटि, फ़ुलके, फ़्राय राईस याबरोबर गरमा गरम मस्तच लागते.
अधिक टीपा:
पनीर तळले तरिहि चालेल.
भाजी करताना मंद आचेवरच करावी। घाई करु नये.
हे मनोगत वरुण घेतले आहे.