शुक्रवार, १८ जुलै, २००८

बीन तुपाचे लाडु (झटपट लाडु) मिनु शुक्र, २९/१२/२००६ - ०९:२९.

वाढणी:१० लाडु
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी खवा,१ वाटी रवा,१ वाटी खोबरे (ओले किंवा सुके)
२ वाटी पिठीसाखर , बेदाणे, काजु, पिस्ता, बदाम, वेलची , जायफळ पावडर २ चमचे
क्रमवार मार्गदर्शन:
खवा ,रवा ,खोबरे हे सर्व मिक्स करा. हे मिश्रण कुकरच्या भांड्यात घाला.कुकरमध्ये ३ शिट्ट्या करा. जर का खोबरे ओले असेल तर भांडयावर झाकण ठेवा, सुके खोबरे असेल तर भांड उघडे ठेवा व शिट्टी काढा. हे मिश्रण गार करा. नंतर यात १ वाटी पिठीसाखर घाला. यात सर्व सुका मेवा मिक्स करा‍. जायफळ ,वेलदोडा पुड थोडी जास्त घाला.याचे लाडु बांधा. मिश्रण जास्त गार झाले तर दुधाचा हात लावुन लाडु वळा.


माहितीचा स्रोत:एक कुकरी शो
अधिक टीपा:चविला हे लाडु खुप छान लागतात, आणि होतातही पटकन। जरुर करुन पहा.
हे मनोगत वरुण घेतले आहे.