बुधवार, १६ जुलै, २००८

मुगाची भजी निगीता शुक्र, २५/०५/२००७ - १२:२९.

वाढणी:दोघासाठी (एका वेळेस)
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी मुग ( आधी ५ तास भिजवलेले असावेत)
३-४ हिरव्या मिरच्या
हळद
चवीपुरते मीठ
तान्दळाचे पिठ १ चमचा
तळण्याकरिता तेल
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम मुग व मिरच्या हळद-मीठ घालुन वाटणयंत्रातुन वाटुन घ्यवित. हे वाटण एका भाण्ड्यामधे काढुन त्यात तान्दळाचे पिठ व्यवस्थित कालवावे. तेल तापल्यावर त्यात छोटी-छोटी भजी टाकावित. लालसर रंगावर तळुन घ्यावी व गरम गरम वाढावी.
माहितीचा स्रोत:स्वतः
अधिक टीपा:सॉस बरोबर हि भजी छान लागतात आणि चहाचा आनंद द्विगुणित करतात।
हे मनोगत वरुण घेतले आहे.