सोमवार, २१ जुलै, २००८

दाण्याची आमटी रोहिणी शनि, ०९/०९/२००६ - ०१:२५.

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी भाजलेले दाणे
१ चमचा साजूक तूप, १ तिखट मिरची
२ चमचे चिरलेली कोथिंबीर, २ चमचे खवलेला ओला नारळ
१ चमचा जिरे, अर्धी वाटी चिंचेचे दाट पाणी
गूळ छोट्या सुपारीइतका
चवीपुरते मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
१ वाटी भाजलेल्या दाण्याची साले काढून मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेणे. नंतर त्यात पाणी घालून मिक्सरमधेच गंधासारखे बारीक वाटून घेणे. तूपजिऱ्याची फोडणी करून त्यामध्ये मिरचीचे तुकडे व गंधासारखे बारीक झालेले दाण्याचे मिश्रण घालून त्यात चिंचेचे पाणी, गूळ, कोथिंबीर, ओला नारळ व चवीपुरते मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालणे व उकळी आणणे. पातळ/दाट ज्याप्रमाणे आमटी आवडते त्यानुसार पाणी घालणे.
अमेरिकेत dry roasted peanuts मिळतात ते वापरले तरी चालेल म्हणजे दाणे भाजण्याचा व सोलण्याचा त्रास वाचेल.
ही आमटी वऱ्याच्या तांदुळाबरोबर खातात जसे की आमटी भात.
रोहिणी
माहितीचा स्रोत:सौ आई
अधिक टीपा:ह्याबरोबर बटाट्याची उपासाची भाजी, खमंग काकडी किंवा लाल भोपळ्याचे भरीत व नारळाची ओली चटणी खाणे। गरम गरम वऱ्याच्या तांदुळावर दाण्याची आमटी व त्यावर साजूक तूप. उपासाला करतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.