मंगळवार, २२ जुलै, २००८

कैरीचा तक्कू अंजू मंगळ, २१/०३/२००६ - ०७:४५.

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ कैऱ्या
अर्धा चमचा मेथीचे दाणे तळून त्याची पूड
आवडीप्रमाणे गुळ किसून
तिखट
मीठ
फ़ोडणीचे साहित्य
क्रमवार मार्गदर्शन:साल काढून कैरी किसावी.त्यात मीठ, गूळ, तिखट, मेथीच्या दाण्यांची पूड हे सगळे घालावे. नेहमीसारखी फोडणी करून थंड झाली की तक्कूवर ओतावी.
माहितीचा स्रोत:आजी
अधिक टीपा:दुसऱ्या दिवशी खाल्ल्यास तक्कू मुरल्यामुळे सुंदर चव येते।
हे मनोगत वरुण घेतले आहे.