मंगळवार, २२ जुलै, २००८

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते....तुमचे आणि आमचे अगदी सेम असतेहे जरी खरे असले...आपले ते अफ़ेयर आणि दुस-याची ती भानगड असे जरी म्हणत असलो तरी प्रेमात पडणे हे भाग्य सगळ्याना मिळतेच असे नाही.....न मिळणारी द्राक्षे आंबट मानुन काहीजण त्याची बोळवण करतात...पण एक अनुभवलय तुम्ही....प्रेमात पडले की जग अगदी चांगले दिसायला लागते....सगळे लोक जणु आपल्याबद्दल बोलत आहेत असे वाटु लागते।ती विशेष व्यक्ती दिसली नाही की कसे तरी होते...आणि दिसली की इंग्रजीत बोलायचे तर "थाउजंड बटरफ़्लाईज फ़्लायिंग इन द स्टमक" असे काहीसे होते. एखादा खास क्षण संपुच नये असे वाटते. काळ थांबवणे आपल्या हातात असते तर घड्याळ तिथेच थांबवुन ठेवले असते.....
तुझ्या वाटेकडे डोळे लागले असतात। उगाचच फ़ोन व्हायब्रेट झाल्यासारखे वाटते.त्या वळणावरुन एखाद्या महाराणीसारखी चालत तू येशील.आणितुझे ते वेड लावणारे मिल्लीयन डॊलर स्माईल देशील......

तुझ्या त्या मुस्कुरहाटी च्या ओझरत्यासुद्धा दर्शनासाठी एका पायावर उभे राहुन तप:श्चर्या करावी लागली तरी चालेल असे आपण स्वत:शीच गुणगुणत असतो....मदनमोहनची गाणी पुन्हापुन्हा आठवत रहातात...प्रेम याबद्दल विचार करणंही खूप मस्त वाटु लागते..........आणि आपण चक्क कविता करु लागतो...

तुझ्या त्या मुस्कुरहाटी च्या ओझरत्यासुद्धा दर्शनासाठी एका पायावर उभे राहुन तप:श्चर्या करावी लागली तरी चालेल असे आपण स्वत:शीच गुणगुणत असतो....मदनमोहनची गाणी पुन्हापुन्हा आठवत रहातात...प्रेम याबद्दल विचार करणंही खूप मस्त वाटु लागते..........आणि आपण चक्क कविता करु लागतो...

तुम दिखाई देती होती होतो युंही अच्छा लगता हैहर पेड और दरख्त; भी खुषमिज़ाज़ लगते है......बस वही एक पलहर चलता राहगीरमासूम बच्चा लगता हैं.....
मै भी वही होता हुंफ़िज़ा भी वही होती हैये बदलाव कैसे होते है....ये सोचना भी अच्छा लगता हैइस सोच मे हम कुछ उलझ जाते है....और....तुम दिखाई देती हो......

कबीर म्हणतो "ढाई अक्षर प्रेमके" ।खरंच काय जादू भरली असेल या अडीच अक्षरांत....माझी तुझी कधीतरी भेट होईल... मनातली भावना तुला बोलुन दाखवु....मग तु ही माझ्यासारखीच मोहरुन येईशील......मनातल्या श्रावणसरींत चिंब भिजशील......खरंच होईल का असे....मला जे वाटते तेच तुलाही वाटत असेल? का मग हे आपल्या मनाचे सगळे खेळ....खरेच असेच असेल का....पण मग मी तुला आवडत नसेन तर? मी आवडत नसेन तरीही तु बोलशील माझ्याशी?एक ना अनेक मन प्रश्नानी भरुन जाते.....उगाचच मुकेश ची गाणी आपलीशी होतात....
एखाद्या क्षणी तू दिसतेस ....मनात हिम्मत करुन आपण तुझ्या दिशेने पुढे होतो......मनातल्या मनात तुझ्याशी कसे बोलायचे याची हज्जारदा उजळणी होते...घसा उगाचच कोरडा होतो॥छातीतली धकधक चौकातल्या सगळ्याना ऐकु येइल इतकी मोठ्याने होत असते। प्रेमात पडण्याच्या क्षणाची ती नांदी असते.पडदा वर जाणार असतो....आणि आपण सारे संवाद पुन्हा पुन्हा म्हणतो....या प्रवेशात प्रॊम्प्टर नसतो......असतो तो तुझ्या माझ्यातला एक अदृष्य अवकाश......तो कसा भरुन काढायचा हे कोणीच सांगितलेले नसते.....आपण पुन्हा प्रत्येक शक्यता पडताळुन पहात रहातो.... आलेला क्षण पकडणे हेच काय ते जमवायचे असते...

अब की बार आपसे मिलुंगा ....कुछ सुनुंगा कुछ कहुंगा....पता नही आप क्या कहोगी...शायद यही सोचकरहमने ये मुलाकातखामोशी में गुज़ार दी है.........

स्वत:वर चरफ़डत मी तसाच घरी येतो...अंगातला टी शर्ट हवेत भिरकावत बेडवर पसरतो....झोपायचा प्रयत्न करतो...कितीतरी वेळ तुझाच विचार मनात असतो....
खरेच मी वेडा आहे...मी असा का वागतो।?.... मी खरेच तुला काय देउ शकतो? काय आहे असे माझ्याकडे ज्यावर तू भरोसा ठेउ शकशील ? माझे हे असे अधांतरी जगणे....ना अजुन नोकरीचा पत्ता ना कशाचा ? काय म्हणुन मी तुला काही बोलावे.....काय म्हणुन मी तुला स्वप्ने दाखवावीत........तू एक वेळ मला "आरशात तोंड पाहिले आहेस का माकडा"असे म्हणत झिडकारुन टाकलेस तरी चालेल...पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास....माझी स्वप्ने स्वत:ची म्हणुन रंगवु पहिलीस तर...........उलट सुलट विचारानी मी कावराबावरा होतो....

हवा का झौका और...सनसानाती तुम्हारी याद.....मै कांप उठता हुं...किसी बुढे बरगद सा।अपनी ही जडोंकोऔर एक बार सहमाता हुंकिसी बुढे बरगद सा.....

सकाळी कधीतरी मला जाग येते....मी नक्की काय विचार करत होतो तीच आता संगती लागत नाही

या रब की सुनु या आपकीये सोचते हम जागते रहेंहर करवट की साथ नतीज़ा बदलता गयासुबह होते होते....क्या बताऊं अब...क्या रब का क्या आपकाये ही भूल गया

माझी नजर टेबलावर पडलेल्या माझ्या वही कडे जाते.....अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाने टेबल भरलेले असते....त्या पसा-यातच जीवनाची शुश्क आकडेमोड लिहाणारे माझे पेन आणि क्यालक्युलेटर असतात......ते मला वास्तव जगात पुन्हापुन्हा खेचुन आणत असतात। केवळ भावनांवर अवलंबुन जगता येत नसतं....पैसा हेच सगळे काही असतं हा मोठा मंत्र ते सांगत असतात. पुन्हा पुन्हा डोक्यात तुझे विचार येत असतात.....पैसा हे कही जगण्याचे अन्तीम ध्येय नव्हे...मला एक घरटे उभे करायचे आहे......त्यात तुझ्या बरोबर छोटेसे का होईना माझे स्वत:चे विश्व असेल... ..... तुझे विचार मला बळ देतात...घराला भक्कम पाया असावा तसा माझ्या स्वप्नाना आधार देतात...

ये पेन और कैल्क्युलेटरक्या बयां करेंगे मेरे ज़ज़्बात....इस मंझील की हर बुनियाद;इटोंकी जगहतुम्हारी याद से रखी है॥

कधीतरी एखाद्या कातर क्षणी तुझा हात माझ्या हातात असेल....न बोलताही आपण खूप काही बोलुन जाउ.....आपले भविष्य काय असेल....आपण काय करत असु.....याचाच विचार करत असु... मी तुझा मेहेंदी लावलेला हात हातात घेईन। त्यावरच्यी वेलबुट्टी निरखुन पाहीन.....भूतकाळ माहीत नाही पण आता आपला भविष्यकाळ मात्र एकत्र बांधला गेलाय एकमेकांसोबत..........पण ए...एक सांगशील?

आपके हाथ और ये मेहेंदी॥मै खो जाता हुं इन लकीरों मे...भटक जाता हुं राह मे....खोजते हुवे....बतादो इन मे से....वो कौनसी..............मेरे तकदीर की लकीर हैं?

तू सोबत असलीस की सगळे कसे सोपे वाटते....मी कोठेही गेलो तरी तू सोबत असतेस.......माझ्या मनात का होईना तू माझ्याशी बोलत असतेस.....कुठेतरी मी घाम गाळत असतो....पिचल्या हाडानी रेटत कामाचा गाडा हाकत असतो॥दूर परदेशात एकटाच जगत असतो.....तुझा एक कटाक्ष...एक स्मित मला पुन्हा उभारी देतं.....जगण्याची लढाई लढायचं बळ देतंरस्त्यातले काटेकुटे तर जाणवतही नाहीत।

जब तुम साथ होती होहर राह युंही अच्छी होती है...हर मोड मंज़ील लगता है॥पैरों मे काटोंका कोई.......हिसाब नही लगता हैं...

मी इथे दूर देशात परदेशात अनोळखी मुलखात एकटाच आलोय। इथले सगळेच मला नवखे आहे.....काल इथे पाउस आला होता.....तुला भेटल्या सारखा तो मला भेटला...

कुछ अंधेरा कुछ रौशनी.....बादलो की आडमे॥सूरज युं आधासा ढल गया था।रेल की खीडकी से वो ओझल होतातुम्हारा चेहरा याद आयापलके भीगी; जमीन भीगी...आज की बारीश मे..कुछ मेरे आसूं भी शरीक थे
(क्रमश:)