सोमवार, २८ जुलै, २००८

काकडीचा डोसा

वाढणी:५ ते ६ डोसे
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ मध्यम आकाराची काकडी
१-१/२ ते २ वाटया तांदळाचे पीठ
४-५ हिरव्या मिरच्या
१ इंच आले
हिंग,जीरे,मीठ, चिरलेली कोथिंबीर मूठ भर
पाव चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा सोडा
क्रमवार मार्गदर्शन: प्रथम काकडी सोलून किसून घ्यावी।मिरच्या,आले,जीरे,हिंग वाटून घ्यावी. मग सर्व जिन्नस पाण्यात एकत्र कालवून घ्यावे. पीठ साधारण भज्याच्या पीठपेक्षा जरा पातळ असावे. गरम तव्यावर धिरड्याप्रमाणे पातळ डोसे घालवेत. मध्ये व कडेला तेल सोडावे. उलटून परत खमंग भाजावे. सॉस किंवा चटणीसोबत खावे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.