मंगळवार, १५ जुलै, २००८

झटपट कलाकंद मन्जुशा मंगळ, १८/०३/२००८ - १६:२९.

वाढणी:८
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
दुधाची पावडर २ वाट्या, पाव चमचा लिंबाची पावडर, केशर,
२ चमचे पिठी साखर, सजावटीकरिता चारोळ्या
क्रमवार मार्गदर्शन:पाव चमचा दुधाची पावडर एक चमचा पाण्यात विरघळवून घ्यावी. एका भांड्यात दुधाची पावडर घेऊन ती पाण्याने भज्यांच्या पिठापेक्षा थोडी घट्ट भिजवून घ्यावी. त्यात लिंबाचे पाणी मिसळावे. एका कुकरमध्ये पाणी उकळत ठेवावे. एका कुकरच्या डब्याला तुपाचा हात फिरवून घ्यावा व त्यात हे मिश्रण ओतावे. त्यात केशराच्या काड्या व चारोळ्या घालाव्या. ढोकळ्याप्रमाणे शिटी न लावता सात मिनिटे वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून त्यावर पिठीसाखर भुरभुरून वड्या कापाव्या.
माहितीचा स्रोत:शेफ विष्णू मनोहर ह्यांनी मधुरांगणच्या एका कुकरी शोमध्ये दाखवली.
अधिक टीपा:कालच करून पाहिली । छान जमली. झटपट होते व साहित्यही फार लागत नाही.
हे मनोगत वरुण घेतले आहे.