शुक्रवार, १८ जुलै, २००८

लिंबाचा सॉस मिनु रवि, ३१/१२/२००६ - १०:१८.

वाढणी:४ ते ५ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
४ लिंबे , २ वाट्या साखर , मीठ चवीनुसार
जीरेपुड १ चमचा , तिखट १ चमचा
उकळुन गार केलेले पाणी ४ वाट्या
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम लिंबांना कुकरमध्ये ३ शिट्ट्या काढुन घ्या. लिंबु चिरायचे नाहीत, तशाच शिट्ट्या काढायच्या. नंतर कुकर गार झाल्यावर लिंबातील सर्व बीया काढा.
लिंबु , मीठ , साखर , गरम करुन गार केलेले पाणी (पाणी बघुन घालावे.) , जीरेपुड हे सर्व मिक्सरमध्ये फिरवा. नंतर सॉस पातळ /दाट कसा हवा त्याप्रमाणे पाणी मिसळा.गॅसवर थोडा वेळ शिजवुन घ्या. लिंबाचा सॉस तयार. ४ ते ५ दिवस टिकेल.
माहितीचा स्रोत:मिनु
अधिक टीपा:
हा सॉस फ्रिजमध्ये राहतो.
गोडाचे आप्पे किंवा इतर तिखट पदार्थांसोबत किंवा नुसता पोळीबरोबर ही चांगला लागतो.
हयाची आंबट -गोड चव खुप छान लागते.
हे मनोगत वरुण घेतले आहे.