सोमवार, २८ जुलै, २००८

खमंग काकडी

वाढणी:२ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ मोठी काकडी
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
३ चमचे दाण्याचं कुट
खिसलेला नारळ
मीठ चवी नुसार
साखर चवी नुसार
१ चमचा तुप
१/२ चमचा जिर
क्रमवार मार्गदर्शन:
काकडी बारीक चिरून (खिसुन घेतली तरी चालेल) त्यांतलं पाणी काढून टाका. नंतर त्यात बारीक चिरलेली मिरची, दाण्याचं कूट, साखर, मीठ, खिसलेला नारळ टाकून नीट एकत्र करून घ्या.फोडणीच्या भांड्यात तूप तापवून, त्यात जिरं टाका.जिरं तडतडायला लागलं की, ही फोडणी वर केलेल्या मिश्रणात टाका.
हे मनोगत वरुण घेतले आहे.