मंगळवार, १५ जुलै, २००८

दही-दुधाच्या वड्या मन्जुशा सोम, २९/१०/२००७ - १५:३२.

वाढणी:आवडीनुसार
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
दही,दुध, साखर प्रत्येकी १ वाटी, २ चमचे साखर
क्रमवार मार्गदर्शन:
वरील सर्व जिन्नस एकत्र कढईत गॅसवर शिजत ठेवावे व सतत ढवळत राहवे.घट्ट होत आल्यावर गॅस बंद करून २ मिनिटे ढवळत राहावे. त्यात पिठीसाखर मिसळून तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण पसरावे. आवडीप्रमाणे वड्या कापाव्या.
माहितीचा स्रोत:मावशी
अधिक टीपा:एका वाटीत पाणी घेवून त्यात घट्ट होत आलेले थोडेसे मिश्रण टाकावे। जर मिश्रणाची घट्ट गोळी झाली म्हणजे वड्या जमल्या असं समजावं. जर घट्ट गोळी जमली नाहीतर मिश्रण अजून थोड्यावेळ शिजू द्यावे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.