मंगळवार, २२ जुलै, २००८

नटवर

नटवर
.
लोकल मधला २ क्लासच्या डबा तुमच्या पैकी बर्‍याच जणांना परिचित असेल.सेकंड क्लास आणि तो ही लेडीज सेकंड क्लास म्हणजे ...गडबड- गोंधळ, भांडण बाचाबाची, सड्या-डागांची चौकशी व घर, नवरा, मुलं यांच्याशी जोडलेली गार्‍हाणी. त्यात मधून फिरणारे फेरी वाले आणि गोंधळामुळे बावचळून गेलेल्या लहान मुलांची चिरचिर, या सगळ्याला छेदणारी एक हास्याची लकेर हे त्याचं वरवर दिसणार रूप, पण या वातावरणात आपला प्रवेश झाला की मग आपल्याला त्यांतील आणखीनं पात्रे कळू लागतात. त्यांच्या भूमिका पाहताना सगळ्या गर्दी गोंगाटाचा विसर पडतो, निदान मला तरी!.
ट्रेन मध्ये शिरल्यावर एक दोन मिनटांतच माझी भूमिका सुरू होते. मी त्या चालत्या बोलत्या रंगमंच्याचा अविभाज्य घटक बनून जाते.भूमिका रंगमंच हे जरा वेगळं वाटतंय ना?पण तुम्ही ते माझ्या भूमिकेतून पाहिलंत तर मग तुम्हाला तसं वाटणार नाही. कारण ट्रेन मध्ये माझी भूमिका बर्‍याचदा प्रेक्षकाचीच असते. कधी कधी एखाद्या भूमिकेला दिलेली दाद तिही प्रेक्षक म्हणून... हे लिहीत असताना कितीतरी चेहरे माझ्या नजरे समोरून सरकून जात आहेत. त्यांचे हावभाव अगदी आत्ता घडत असल्यासारखे मला स्पष्टपणे दिसतायत.....मी नुकताच पाहिलेला एक एकपात्री प्रयोग... तो महान अभिनेता विसरणे अगदी अशक्य!
तो एक पाच-सहा वर्षांचा लहान मुलगा असेल ... असेल असे एव्हड्यासाठी की तो मुलगा आहे याची मला बराच वेळ खात्री नव्हती. त्याचा पोशाख मुलांसारखा होता... सैलसर शर्ट, त्याच्या खाली कळपट मळकी पॅन्ट, मोठ्ठे-मोठ्ठे डोळे, धार-धार नाक पातळ नाजूल ओठ, नितळ मुलायम गाल, डोक्यावर तेलानं चापून चप्प बसवलेले लांब केस ..... एकूण चेहरा नाजक होता... तरी आपण त्याला मुलगाच म्हणूया . नाव काय असेल बरं त्याच?... अं अं...!! हा!!आपण त्याला नटवर म्हणूया. त्याला इतर कोणतं नाव छे!!![ मुळिच नको]
आता कसं तो मुलगा करून बोलण्या पेक्षा नटवर म्हणायला जरा बरं वाटत नाही!!! तर हा नटवर त्याच्या वया पेक्षा जरा जास्तच धीट... मी ट्रेन मध्येचढल्या नंतर लगेचच्याच स्टेशन वर तो ट्रेन मध्ये चढला. माझ्या समोरच्या सिटवर एक प्रौढ बाई खिडकी शेजारी बसल्या होत्या , तो सरळ त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला "आंटी मुझे खिडकी में बैठना है, थोडा खिसक के बैठो" त्याच्या बोलण्यात जरा सुद्धा भीती किंवा बुजरेपणा नव्हता, त्या बाईंना देखील अशीच नातवंड असवितं! त्यांनी लगेच नटवरला खिडकीतली जागा देऊ केली, तसं ही... लोकल ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहण्यासारखं असतच काय ? हां! थोडा वारा मिळतो कोण कोणत्या वासांच्या भपकार्‍या बरोबर... नटवरला मात्र खिडकी हवी होती.
त्या बाई, त्यांना आपण सुमन काकी म्हणू ... सुमन काकी जरा बाजूला होताच नटवर लगेच खिडकी शेजारी बसून बाहेर डोकावू लागला. खरं तर ... इथं पासून त्याच्या भूमिकेची सुरुवात झाली. तो अभिनय मी अगदी पहिल्या रांगेत बसून पाहतं होते. डब्यात नेहमी प्रमाणे काही फेरीवाले फिरत होते. त्यातली एक फेरीवाली तिच्या टोपलीत चिक्की राजगिर्‍याच्या वड्या, वेगवेगळ्या आकारांचे फ्रयंम, वेफर्स, चिवडे वगैरे वगैरे खाऊ घेऊन आली. नटवर बराच वेळ तिच्या कडे बघून चुळबूळ करत होता.ती फेरी वाली आमच्या सिट जवळ आली तसे त्याने जोरात आपल्या आईला हाक मारली... "मम्मी'' हाक मारताना त्याच्या चेहर्‍यावर एखादी अद्भुत!! नावीन्यपूर्ण!! गोष्ट पाहिल्या सारखे भाव होते.. मग क्षण भर तो अगदी स्थब्द उभा राहिला.....काहीच हालचाल नकरता स्थब्द. कोरा करकरीत चेहरा ना आशा ना निराशा ना चिक्की वेफर्ससाठिची इच्छा त्या लगोलग घोर निराशा झाल्याचे भाव त्याच्या चेहर्‍यावर पसरत गेले अधिक अधिक खचत जाणारा नटवरचा चेहरा म्हणजे...जणू केविलवाणेपणाची परिसीमा!! तो इतका दीन बनला... की काय विचारता तोंडाने कळवळल्यासारखे विभ्रम करीत त्याने अर्धवट उघडलेल्या हातांनी याचना करू लागला... तो भिकार्‍याच्या भूमिकेत शिरला होता. हा नटवर आणि त्याची मम्मी, यांच्या मधला दूरून केलेला साभिनय शब्दहीन संवाद... त्याला आजू बाजूच्या बघ्यांशी काही देणे-घेणे नव्हते... किंवा असे म्हणू का?... की त्याच्यासाठी त्याच्या अवती भवति कोणी नव्हतेच,फक्त तो आणि त्याची मम्मी... बस्स! दोघेच स्टेजवर... बाकी सगळी अंधारात दिसतील न दिसतील असे बसलेले प्रेक्षक. त्यांनी फक्त बघत राहाव थक्क होवून किंवा फार फार तर टाळ्या वाजवाव्यात. =D>
नटवर भिकार्‍याच्या भूमिकेत इतका समरस झाला होता की त्याला आधी न पाहिलेला कोणी ही त्याच्या हातावर पैसे टेकवल्या शिवाय पुढे गेलाच नसता इतकं दैन्य अशी याचना आणि भोळा भाबडा चेहरा... त्याला त्या अवस्थेत बघून मी ही बुचकळ्यांत पडले. मगाशी पाहिलेला मुलगा तो हाच की भिकारी , का तो मगाशी धिटाईने इथे येऊन बसलेला भिकारीच होता ? तेव्हड्यात त्याच्या मम्मीचा आवाज ऐकू आला ....''आभी चूप बैठं नही तो एक झापड लगाऊंगी'' तो भिकारी नव्हता तो भीक मागण्यासाठी डब्यात चढला नव्हता तो ही आमच्या सारखाच एक प्रवासी होता.
त्याच्या मम्मीच्या आवाजासरशी त्याने आपला भिकार्‍याचा अवतार तिथेच आटोपता घेतला. हा मुलगा शांत राहणारा नाही! हे आतापर्यंत आम्हाला जाणवले होते. आणि अजून तरी तो शांतच बसला होता. तसं मगाशी खाऊ साठी अगदी भिकार्‍याच्या भूमिकेत ही शिरणारा नटवर भलताच हट्टी ही वाटला होता. पण त्याने हट्ट तरी कुठे धरला... तरी तो आता काय करेल याची धास्ती आम्हाला लागून राहिली होती. मी तर त्याच्या अगदी समोर बसलेले, नाही म्हटलं तरी नजर त्याकडे वळतच होती. आणि मला जाणवलं अरे हा तर आमच्या सिट खाली काहीतरी बघतोय. त्याच्या चेहर्‍यावर कुतूहल ओसंडून जात होते.... आणि ''माझ्या भिती '' आता त्याचे टार्गेट माझ्या खाली [का मिच ] होते!! नटवर मान वळवून वळवून माझ्या सिट खाली पाहतं होता... त्याला तिथे काहीतरी खास दिसत होते नक्की!! मी माझ्या पायांकडे बघून घेतले, जरा पायांच्या अवती भावती नजर फिरवली पण छे!.. मला तिथे काहीच वेगळे दिसेना, कागदाचे चीटोरे काही शेंगांची टरफले पतर्‍यावरचे मळकट डाग एकूण सगळे काही नेहमीचेच त्यात इतके टक लावून बघण्यासारखे काय असावे?....
नटवर आता अगदी एकाग्र झाला होता. एखाद्या तिरंदाजाने शिकारीच वेध घ्यावा तसा... किंवा अगदी अर्जुना सारखा ... अर्जुनाला जसा पक्षाचा डोळा दिसत होता तसं आता नटवरला माझ्या सिट खाली काहीतरी दिसत होत. तेव्हाची नटवरची तल्लीनता अगदी पाहण्यासारखी होती , जणू तो नजरेनेच ति वस्तू ओढून घेत होता....तेव्हड्यात आणखीनं एका फेरीवालीची रंगमंचावर एंट्री झाली, आणि तिच्या मुळे नटवरची तंद्री भंग पावली. नटवर आता तिच्या दिशेने पाहतं होता त्याला दुसरे टार्गेट मिळाले होते.मनातल्या मनात मी नटवरनी दिला असता तस्सा सुटकेचा सुस्कारा सोडला.... [ सुटले ] आता आलेली ही फेरी वाली जवाहर खाना घेऊन आली होती. खरंतर नटवरला त्यात काय रस असावा? हे आपल मला वाटल त्याला मात्र त्यात ही स्वारस्य होते त्याला जगातल्या प्रत्येक गोष्टीत स्वारस्य होते... खिडकीतून दिसणार्‍या आकाशाच्या तुकड्यात , रुळां पलीकडे वसलेल्या झोपड्यांमध्ये, मागे मागे पळत जाणार्‍या झाडाझुडपात, डब्यात पसरलेल्या कचर्‍यात तस्साच या चमकत्या अंगठ्या कर्ण फुलात . त्याला प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट बघायची होती, पारखायची होती...
माझ्या शेजारी बसलेली एक चिमुरडी या विक्रेतीकडच्या रिंगा बघू लागली, समोरची सुंदरी ही तिला येऊन मिळाली, दोघी जणी मिळून अंगठ्यांच्या बॉक्स मध्ये उचक पचक करत होत्या... चिमुरडीला एक रिंग आवडली '' ये अंगुठी काइसे दी?'' चिमुरडीने विचारले. ''हर अंगुठी का पाच रुपैया..एक ही भाव'' हा संवाद होई पर्यंत नटवर तिथे पोहचला होता. सोनेरी, चंदेरी, ऑक्सिडाईझ खड्यांच्या बीन खड्यांच्या अंगठ्यांची बरीच मोठी रेंज त्या बॉक्स मध्ये होती . नटवर त्यातली एक एक अंगठी उचलून एखाद्या कुशल पारख्या प्रमाणे निरखू लागला... या वेळी तो पारखीच नाही तर त्या मुलींसाठी सल्लागार बनला होता, चिमुरडी किंवा सुंदरीने एखादी अंगठी उचलली रे उचलली की याची प्रतिक्रिया बघावी काय काय तोंड करून तो आपली पसंती नापसंती त्या दोघीनं पर्यंत पोहचवत होता जणू त्या दोघी याच्या सल्ल्यानेच खरेदी करणार होत्या. [ काही पण] सुंदरीला अखेर एक अंगठी पसंत पडली .ऑक्सीडाईझ रिंगवर बारीक उभारदार डिझाइन होते , नटवरला काही ती अंगठी आवडली नाही त्याने नाक मुरडून त्याची नापसंती झटक्यात दर्शवली पण सुंदरीची निवड करून झाली होती ... आता पुठचे काम बर्गीनींग ते ही तेवढेच महत्त्वाचे नाही का! पण आता नटवरला त्यात काही उत्सुकता उरली नाही सुंदरीने त्याचे मार्ग दर्शन न घेतल्यामुळे तो बराच निराश झाला आणि त्या दोन नाठाळ मुलींना सोडून काहीतरी पुटपुटत तो आपल्या खिडकीतल्या जागेवर जाऊअन बसला. तिकडे नटवरचा अभिनय आणि इकडे बार्गिनींग रंगत होतं .
नटवर चा मोर्चा परत आमच्या सिट कडे वळला ...मगाशी तो काही तरी ओढत होता आता ती वस्तू त्याला ओढून घेत होती....कोणी ओढावे आणि आपण प्रतिकार करावा अस काही तरी तो करू लागला हळू-हळू त्याचा प्रतीकार क्षिण पडू लागला आणि अनुराग सिट खाली ओढला जाउ लागला त्याला काही तरी जबरदस्तीने खेचून नेत होते तेव्हाची त्याची असहाता अगतिकता बघण्या सारखी होती आत्ता पर्यंत घडलेल्या गोष्टीं मुळे नटवर काय चीज आहे आम्हाला कळून चुकले होते नाहीतर त्याच्या या अभिर्भावाने आमची नक्कि दाणादाण उडली असती ...आता नटवर त्या अनामीक शक्तीच्या पुरता आहारी गेला होता त्याचे पाय आमच्या सिटखाली चाले होते आणि मग पुन्हा एकदा नटवर आणी ती अदृश्या शक्ती यांच्यात झटापट सुरू झाली , नटवर स्वत:ला वाचवू पहात होता... आणि त्याच वेळी आणखिन काही तरी ओढत ही होता.....त्याचे हे चाळे इतके सहज आणि वस्तव वाटत होते की त्याला थांबवाव ओरडाव, रागवाव अस कुणाला सुचलच नाही. आता नटवर बर्‍यापैकी संकटातून बाहेर आला होता आणि त्याने आणखीन काहीतरी आपल्या बरोबर आणले होते. मग सर्व ताकद एकवटून त्याने खाली उडी घेतली....झप्पकन ती वस्तू हातात घेतली आणि तस्साच चपळतेने त्याच्या जागेवर जाउन बसला. तो सर्वांपासून काही तरी लपवत होता, काहीतरी खुप मोल्यावन...ते जर कुणाला दिसल तर आखा जग त्याच्या पाठी लागणार होत त्याच्यावर खुप मोठ्गी जवबदारी होती जगाला वचवाची जवाबदारी! एवढ्या मोठ्या जवाबदारीचा ताण त्या छोट्या जीवावर... कय दृष्या होतते मी काय सांगू अशी दृश्या पहावीच लागतात. खुप वेळ चाललेल्या या संघ्र्शा मुळे नटवर थकून गेला होता थोडावेळ तसाच निपचीत पडल्यावर तो हळू हळू हालचाल करू लागला. त्याचे बंद डोळे उघडले गेले आजू बाजूला पाहून त्याने पुन्हा एकदा त्याच्या सुर्क्षीततेची खात्री करुन घेतली, आणि हलकेच मागे लपवलेले हात पुढे आणले त्याच्या हातात जनू स्वर्ग आला होता .
काय आहे त्याच्या हातात, काय आहे! समोर बसलेल्या प्रत्येकाच्या मनानात हे नक्की आल असणार, आता नटवर चे जुळलेले हात पुढे आले होते।त्याचा चेहरा कमळासारखा खुलला होता॥ त्याची नजर हातांच्या बंद शिंपलीवर खिळली होती!ती शिंपली आणि शिंपलीतला अद्भुत खजाना!ती शिंपली हलकेच उघडत गेली..... अन त्या शिंपलीच्या उघडण्या बरोबर नटवर चा चेहरा आणखीन आणखीन तेजाळत गेला त्याचे आधीच मोठ्ठे असलेले डोळे आणखीनं विस्फारत गेले!काय? काय आहे ? त्या शिंपल्यातमाझी उत्सुकता आता भलतीच ताणली गेली होती, डोळे नटवरच्या हातावर खिळले होते। इतकी अधीर मी! नाटवर केव्हा हात पूर्णं उघडतोय आणि मी केव्हा ती वस्तू पहातिये...माझी उत्सुकता ताणत ताणत एकदाची नटवर ची ओंजळ उघडली आणि........... फूस त्याच्या हातातला एका तुटक्या हिरव्या रंगाच्या बांगडीचा तुकडा मला दिसला. छे!... काय हे !. हा तुकडा बघण्यासाठी का मी एतकी अधीर होते. मला माझेच हसू आले ) , आणि नटवर, त्यावर हसू की चिडू काही कळतच नव्हते. तेव्हडी उसंतच कधी दिली त्याने, तो त्याच्या उद्योगात मशगुल होता. त्याने कधी मला सांगितले ये बघ माझ्या हातात काय आहे. मी स्वत: हूनच तर बघत गेले. मग त्या वर का रागावावे?
पण नटवरसाठी तो तुकडा खरंच खूप मौल्यवान होता. खजिन्या इतका मौल्यवान!तो आता ही मघाच इतकाच खूश होता. त्याच्या चेहर्‍या वरचा आनंद मघाच सारखाच ओसंडून वाहतं होता. आता मी त्याचा चेहरा पाहतं होते त्याचे ते डोळे त्यातली खजिना सापडल्याची चमक अद्भुत... केवल अद्भुत!!!किती निरागस आहे हा!!मी ही कधी अशीच होते नाही का...माझ्या जवळ ही असाच खजिना होता!!!नटवर मला माझ्याही नकळत त्या दिवसांमध्ये घेऊन गेला. आता मी मलाच पाहतं होते, काचपाणी खेळण्यासाठी काचांचे तुकडे जमा करणारी मी ,तेव्हा त्या काचा मला खजिन्या इतक्याच प्रिय होत्या नाही का!आणि काय! काय... होत माझ्या खजिन्यात! चिंचोक्यांचासाठा, गुंजा, पिंपळाची जाळीदार पान, मोरपीस, नदीच्या पत्रातील वेगवेगळे स्फटिक गारगोट्या, गोट्या, फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या आणि काय काय ही तर अलीबाबाची गुहा आहे .मी अलीबाबाच्या गुहेत हरवणारच होते तेव्हड्यात नटवरने मला खेचून बाहेर काडल.कुठे आहे मी?माझा खजिना !काही क्षण खरंच कळेला त्या सुंदर विश्वातून मी ही एकदम कुठे आले....समोर नटवर तो मला अस सहजासहजी हरवू देणार नव्हता. अरे आता काय करतोय हा?थोडा वेळ कौतुकाने न्याहाळून अंजारून गोंजारून नटवर त्या काळजाच्या तुकड्याशी संवाद साधत होता. त्याच्या चेहर्‍यावर नक्की कोणते भाव होते त्यात कौतुक होत, वेदना होती, एक अनिवार्य व्यथा होती, काळजी, असहायता, एक तुटलेपण त्याचे हसरे ओठ आणि पाणावलेले डोळे पाहिले असतेत तर तुम्हाला ही एक अविस्मरणीय अनुभव आला असता आता तो कोणत्या भूमिकेत आहे सांगू शकाल!...............मला तर माझी आईच आठवली....माझी पाठवणी करतानाची आई !अरे अरे ... अरे थांब का का टाकतोयस ती काच?किती चिकाटीने मिळवलेलीस तू तेव्हाचा तो आनंद मी ही न्हाऊन निघाले त्या हसर्‍या क्षणात तू तर अखंड बुडला होतास ना आनंद डोहात मग आता हे का !हे सगळा मनातल्या मनात.प्रेक्षकांना स्टेजवरच्या पात्रांशी असाच संवाद साधावा लागतो ना? त्याने तो काचेचा तुकडा खिडकीतून बाहेर काडला होता ..... पण का?तो ती फुटकी बांगडी फेकून देत होता.... 'एव्हड्यातच कंटाळा आला का खेळण्याचा ' पण नाही हा कंटाळा नव्हता कदाचित खेळ, जीव घेणं खेळ.... नटवर ही कासावीस झाला होता त्याच्या चेहर्‍यावर ओढाताण स्पष्ट दिसून येत होती .... पिळवटलेल्या अंतःकरणाने त्याने तो काचेचा तुकडा खिडकी बाहेर काडला होता, त्याच अंग एकदम आक्रसून गेलं होत, डोळे गच्चमिटलेले स्स्स...... आता काही तरी भयानक घडणार होतं.आSSS...............त्यानं ती काच खिडकीतून खाली सोडून दिली. आ आ अरे!... का? आऽऽऽऽजणू त्या काचेचीच किंकाळी माझ्या कानात घुमू लागली... आणि ती काच अशी निर्दयीपणे सोडून देणारा नाटक्या माझ्या समोर बसला होता... आता काही क्षणां पूर्वी ती काच त्याचा ध्यास होती, मग साधना, साध्य किती आत्मीयतेने बघत होता तू त्या तुकड्या कडे!त्या नंतरची ती जीवाची घालमेल .... आणि आणि आताचा हा सुटकारा कोणते भाव खरे?हे माझ्या डोक्यातले किडे केव्हा आणि कुठे ही वळवळणारे त्याच नटवरला काय तो त्याच्याच मस्तीत मशगुल.....काचेचा तुकडा खिडकीतून बाहेर टाकतानाचे गच्च मिटलेले डोळे उघडून त्याने दीर्घ सुटकारा सोडला.''चला एक काम झाले.'' चा आविर्भावहा बहुतेक एकपात्री प्रयोग होता त्यातला हिरो नटवर व्हीलन नटवर, बाकी सारी पात्र ही तोच...त्यानंतर ही त्याचे काही ना काही चाळे चालूच होते आणि माझं विचार चक्रही! तो काही ना काही करत राहावं आणि मी त्याच्या त्या हालचालींतलं नाट्य अनुभवत राहावं.....''मम्मी'' त्यानं परत एकदा त्याच्या आईला हाक मारली... दोन्ही हात नमस्कार केल्यासारखे एकमेकांना जोडले आणि कानाच्या दिशेला नेले त्या जोडलेल्या हातांवर मान तिरकी करून अलगद टेकवली आपल्या पापण्या मिटून घेतल्या, तो त्याच्या आईला आपण झोपत आहोत असे सांगत होता! पालीकडून ''सोजा.''.. अस तुटक उत्तर आलं. ती परवांगी घेऊन नटवर त्याच्या जागेवर झोपी गेला.
तो खरंच झोपलाय की.... हा ही त्याच्या कोणत्या भूमिकेचाच भाग असणार आहे हे पाहायला आता मी थांबू शकत न्हवते, माझं स्टेशन जवळ येत होत.मघाचच्या माझ्या आजूबाजूला बसलेल्या बायका, मुली केव्हाच उठून गेल्या होत्या. त्या जागेवर एक टवटवीत मुलगी येऊन बसली! बाकीचे आम्ही सगळे जण शिणवटलेले सैलावलेले दिसत होतो, एक ती सोडून!. ती आताच उठून आवरून आल्यासारखी ताजी तवानी पावडरच्या जाहिरातीतल्या मॉडेल सारखी एव्हर फ्रेश, उत्साहाने सळसळणारी ब्युटी क्वीन माझ्या शेजारी येऊन बसली. नेव्ही ब्लियू कलरचा स्कर्ट त्यावर त्याच रंगाचा कोट, त्या मधून डोकावणारी फिकट निळ्या गुलाबी रंगाची कॉलर हा तर एअर इंडियाचा युनिफॅर्म .. तिची बहुतेक नाइट शिफ्ट असावी, त्या नंतर तिला तसाच पोशाक केलेली आणखीन एक ब्यूटीक्विन येऊन मिळाली!...डब्यातलं नाट्य असच रंगणार होत... नवे कलाकार स्टेज वर येत होते नवे प्रेक्षक आसनस्थ होत होते मला आता उतरायचं होत मी उठले माझी जागा क्षणार्धात भरली गेली. उतरण्या आधी नटवरच्या मम्मी ला शोधण्याचा प्रयत्न केला.. आता पर्यंत मी तिचा फक्त आवाजच एकला होता तोही अगदी जेव्हड्यास तेवढा, आणि बुरख्यांची ही गर्दी त्यातला कोणता बुरखा नटवरची मम्मी हे काही मला कळू शकले नाही. त्या बुरख्यांकडे आणि नटवर कडे एकदा बघून मी कौतुकाची पावती फाडली..ऽ अणि उतरले.नटवरला बरोबर घेऊन! तो माझ्या डोक्यातून कधीच उतरणार नव्हता अगदी आता या कागदावर उतरवे पर्यंत तो माझ्या बरोबरच होता आणी आता हि असेल माझ्याच काय तुमच्या ही बरोबर....काय होईल त्याच पुढं!... काय बनेल तो? नटवर एक नटसम्राट की नटवर नाटक्या.....गुड बाय आणि गुड लक माझ्या सह प्रवाश्यांनो!.....
..............................................समाप्त
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.