बुधवार, १६ जुलै, २००८

सांबार (कोकणी पद्धतीत) लम्बोदर बुध, ०९/०५/२००७ - १६:३३.

वाढणी:४ जण
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
भाज्या : गवार, शिमला मिरची, दूधी (एकत्र पाव किलो) (किंवा तुम्हाला आवडेल ती भाजी)
कडधान्य : काळे वाटाणे, मुग, पावटे (मोड आलेले) एकत्र २५० ग्राम
गरम मसाला (३ चमचे), १ चमचा खसखस,
१ वाटी सुका नारळ (किसलेला) , १/२ वाटी कांदा (उभा चिरलेला),
१/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, १/२ वाटी चिरलेला टोमॅटो
फोडणी साठी : कांदा, कडिपत्ता, लसूण, तेल
क्रमवार मार्गदर्शन:
१. भाज्या व कडधान्य (बारिक चिरुन) कुकर मधे शिजवुन घ्यावे.(दोन शिट्यामधे)
२. वर दिलेल्या प्रमाणानुसार खसखस, सुका नारळ, कांदा हे एकत्र भाजुन घ्यावे. (थोडे लालसर होई पर्यंत) मग कोथिंबीर व टोमॅटो टाकुन थोडेसे एकत्र भाजुन घ्यावे.
३. हे गार झाल्यावर मग याचे एकत्र वाटप करावे.(थोडेसे जाडसर वाटावे, जास्त बारीक वाटल्यास चव निघुन जाते किंवा सारण पातळ होण्याची शक्यता असते म्हणुन) ( गरम मसाला वाटपात एकत्र वाटावा कींवा सांबार शिजवताना टाकावा.)
३. गॅसवर पातेले ठेवुन (नेहमीचे ज्यात आपण वरण करतो ते) वर दिलेल्या फोडणी च्या साहित्यानुसार, फोडणी दिल्यावर, त्यात वाटलेले सारण २ मिनिटे भाजुन घ्यावे. मग शिजलेल्या भाज्या व कडधान्य मिसळून ३ वाट्या पाणी व चविनुसार मीठ टाकुन १० मिनिटे उकळी काढावी.
झाले गरम गरम सांबार तयार ...हे सांबार भाताबरोबर छान लागते.
माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:
हे सांबार कोकणीमाणसं जास्त करतात.
ज्यांना भाज्या किंवा कडधान्य आवडत नसल्यास त्यांना हे सांबार नक्की आवडेल.
गरम मसाल्या ऐवजी कोकणी मसाला वापरला तर जास्त चविष्ट लागते.
हे मनोगत वरुण घेतले आहे.