शुक्रवार, १८ जुलै, २००८

बटाट्याच्या वड्या (काप) लम्बोदर शुक्र, २४/११/२००६ - ०९:३१.

वाढणी:?
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
बटाटे ५
ओला नारळ (१ वाटी किसुन)
साखर (२ वाटी)
वेलची पुड
तुप
थोडा सुक्या नारळाचा कीस
क्रमवार मार्गदर्शन:
सर्व प्रथम बटाटे उकडुन घ्यावेत. थंड झाल्यावर ते किसुन घ्यावे किंवा हाताने स्मॅश करुन घ्यावे.
गॅसवर कढईत तुप गरम करुन त्यात साखरेचा पाक करुन (घट्ट नको) वरिल साहित्य टाकुन ढवळावे.(वेलची पुड नंतर टाका) ते एकजीव होई पर्यंत चागले ढवळावे. लालसर रंग यायला लागला कि लगेच गॅस बंद करा.
मग ताटाला तुपाचा हात लावुन वरिल मिश्रण पसरावे. आणि वरुन थोडा सुक्या नारळाचा कीस पसरुन टाकावा.
थोडे थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात
झाल्या मस्त वड्या तयार.....
(ह्या वड्या जास्त दिवस टिकतात कारण खोवऱ्याचे प्रमाण कमी आहे म्हणुन खवट होण्याची शक्यताही कमीच)

माहितीचा स्रोत:माझी आत्या
अधिक टीपा:
माझा सर्वात आवडता पदार्थ आणि तोही माझ्या आत्याच्या हाताचा.
करुन बघा आणि प्रतिसाद द्या।
हे मनोगत वरुण घेतले आहे.