मंगळवार, १५ जुलै, २००८

ओट फ्लेक्सची बिस्किटे स्वाती दिनेश मंगळ, १६/१०/२००७ - १२:०३.

वाढणी:३५,४० मध्यम आकाराची बिस्किटे होतात
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२५० ग्राम ओट फ्लेक्स,२०० ग्राम बटर,१२५ ग्राम साखर,
१२५ ग्राम मैदा,२ टीस्पून बेकिंग पावडर,१ अंडे,१चिमूट मीठ
वॅनिला अर्क १.५ चमचा
क्रमवार मार्गदर्शन:
मैदा+बेकिंग पावडर+१ चिमूट मीठ एकत्र करणे.बटर गरम करम करणे,त्यात हा बे.पा.+मीठ घातलेला मैदा घालणे, ओटफ्लेक्स घालणे,अंडे फोडून घालणे,वॅनिला अर्क व साखर घालणे व सगळे मिश्रण एकत्र करणे‌.बेकिंग ट्रे मध्ये बेकिंग पेपर ठेवणे.या मिश्रणाचे अंतराअंतरावर मध्यम आकाराचे सांडगे घालणे.१८० ते २०० अंश सेंटीग्रेड तापमानावर साधारण २० मिनिटे बेक करणे.
माहितीचा स्रोत:त्सेंटा आजी
अधिक टीपा:१।दोन बिस्किटात अंतर ठेवावे कारण बेकिंग पावडर असल्याने बिस्किटे फुलतात आणि अंतर नसेल तर एकमेकांना चिकटतात.२.बिस्किटे तयार झाली की अवन मधून एका ट्रेमध्ये/ ताटामध्ये काढून घेणे व पूर्ण गार झाली की डब्यात भरणे अन्यथा वाफ धरून बिस्किटे मऊ पडतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.