सोमवार, २१ जुलै, २००८

बेसन लाडु - वेगळा प्रकार सायली जोशी बुध, ०९/०८/२००६ - २२:२८.

वाढणी:२०-२२ लाडु
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
३ वाट्या बेसन
अर्धी वाटी रवा
अर्धी वाटी दुध
२ वाट्या साखर
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम मंद आच ठेऊन तुपावर बेसन व रवा एकत्र भाजुन घ्यावा. मग गॅस बंद करुन कोमट दुध घालावे. पराती मधे ओतुन मिश्रण कोमट असतानाच त्यात साखर घालावी व छान एकजीव करावे व लाडु वळावेत.
माहितीचा स्रोत:सौ.आई.
अधिक टीपा:
दुधामुळे खमंगपणा येतो व रव्यामुळे लाडु छान रवाळ होतात पण रव्याचे प्रमाण बेसनाच्या तुलनेत कमी असल्याने रव्याची चव लाडवात फारशी लागत नाही.
हे मनोगत वरुण घेतले आहे.