शनिवार, २६ जुलै, २००८

पास्ता

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पास्ता ३ मुठी भरुन नळकांडीच्या आकाराचा किंवा जो आवडेल त्या आकाराचा
चिरलेला कोबी वाटीभर, गाजर१, सिमला मिरची अर्धी, मटारचे दाणे वाटीभर
लसूण २-३ पाकळ्या
चिरलेला कांदा ४ चमचे
टोमॅटो सॉस ४२५ ग्रॅम, (hunt's किंवा spaghetii) जे आवडेल ते
तेल, तिखट १ चमचा, धने-जीरे पूड १ चमचा, मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
सर्वात प्रथम एका कढईत पास्ता पाणी घालून शिजवून घ्यावा. नंतर तेलाच्या फोडणीमधे बारीक चिरलेल्या लसुण पाकळ्या व कांदा घालून परतणे. नंतर बारीक चिरलेला कोबी, गाजर, सिमला मिरची उर्फ ढब्बू मिरची, व मटारचे दाणे घालून परतणे व मंद वाफेवर शिजवणे (जशी भाजी शिजवतो तसे). नंतर त्यात १ चमचा लाल तिखट, १ चमचा धने-जिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घालून परतणे. परतून झाल्यावर त्यात शिजवलेला पास्ता व टोमॅटो सॉस घालून ढवळणे. १-२ वाफा देवून परत ढवळणे.
गरमागरम पास्ता खाणे, त्यानंतर आवडीचे आइसस्क्रीम खाणे।
हे मनोगत वरुण घेतले आहे.