सोमवार, २१ जुलै, २००८

रव्याचे पुडींग स्वाती दिनेश मंगळ, १७/१०/२००६ - १४:३७.

वाढणी:३,४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ लिटर दूध, १मूठ बेदाणे,२ चहाचे चमचे वॅनिला साखर/१.५चहाचा
चमचा वॅनिला अर्क(इसेन्स),१/२ ते ३/४ वाटी रवा,१ अंडे,१चिमूट मीठ
१/४ चहाचा चमचा दालचिनी पावडर,१टे-स्पून मध,१ टे-स्पून साखर,
१/२ चमचा लोणी,सजावटीसाठी चॉकलेटच्या सळ्या
क्रमवार मार्गदर्शन:
दुध उकळवत ठेवणे,त्यात बेदाणे घालणे,वॅनिला साखर घालणे,सारखे ढवळत राहणे,दूध उकळत आले की रवा घालत ढवळत राहणे. गुठळ्या होऊ न देण्यासाठी सतत ढवळणे गरजेचे आहे.पुरेसे घट्ट झाले की रवा घालणे थांबवणे, १ अंडे फोडून घालणे,दालचिनी पावडर,मीठ घालणे .मिश्रण अजून घट्ट झाले की आचेवरून उतरवणे.
ज्या काचेच्या वाडग्यात हे पुडींग ठेवायचे आहे,त्याला लोणी लावून घेणे व हे मिश्रण त्यात घालणे.
(१५ मिनिटे एवढ्या कृतीला लागतात.पण..)
कक्ष तापमानाला आले की शीतकपाटात ६,७ तास ठेवणे.
खायला देण्याच्या आधी चॉकलेटच्या सळयांनी सजवणे.
माहितीचा स्रोत:अर्थातच त्सेंटा आजी
अधिक टीपा:
जर्मनीत वॅनिला साखरेची छोटी पाकिटे मिळतात.(१पाकिट ८ ग्रामचे असते.)ते एक पाकिट या मिश्रणाला लागेल.
आणि याचे जर्मन नाव आहे: ग्रीस पुडींग.
ग्रीस=रवा....कसे वाटले?
हे मनोगत वरुण घेतले आहे.