मंगळवार, २२ जुलै, २००८

शिपोकू सवाई शनि, ०४/०२/२००६ - ०१:००.

वाढणी:२
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
४ पोळ्या
फ़ोडणी, ओल खोबर
काजू ,दाणे
टोमाटो
तीळ
कान्दा
क्रमवार मार्गदर्शन:
या पाकक्रुतीसाठी पोळ्या करता येत असल्यास ऊत्तम अथवा पुण्यात सर्वत्र घरगुती घडीच्या पोळ्या मीळतात.
पद्धतः
४ पोळ्या ह्या खाता येणार नाहीत या स्थीतीपर्यन्त आल्यानन्तर ( पुरेश्या शीळ्या झाल्यानन्तर) त्या कुस्करून घ्याव्यात.
त्यामधे कान्दा बारीक कापून टाकावा( कान्दा हा अन्डा भुर्जीसाठी लागतो तीतका बारीक कापू नये, नाहीतर पदार्थाची चव जाते.)
आपल्या गरजेनूसार फ़ोडणी तयार करून चवीनूसार मीठ टाकावे. (मीठ हे नावडतीचे नसावे नाहीतर पदार्थ अळणी होतो. )
गरजेनूसार भीजलेल्या खोबरयाच्या वाटीचे तूकडे ( बारीक काप - चूरमूरेच्या चिवड्यात टाकताना लागतात तीतके बारीक)
आवडीनूसार दाणे तसेच थोडे काजूही टाकावेत आणी थन्डीच्या दिवसात तीळही
हा पदार्थ शक्यतो सकाळी नाश्त्यासाठी चहाबरोबर द्दावा.

माहितीचा स्रोत:रूम पार्टनर
अधिक टीपा:
शिपोकू
हा शब्द जपानी वाटण्याची शक्यता आहे, पण हा पदार्थ ईथलाच आहे . शिळ्या पोळ्यान्चा कूस्करा.
हे मनोगत वरुण घेतले आहे.