सोमवार, २१ जुलै, २००८

भरलेले बटाटे अनुजा कुलकर्णी बुध, २१/०६/२००६ - २३:१४.

वाढणी:कितीहि करा..कमीच पडतात
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
५-६ छोटे बटाटे - दम आलू वगैरेला वापरतात तसे
अर्धी वाटी मक्याचे दाणे उकडून
अर्धी वाटी मटाराचे दाणे उकडून
१ हिरवी मिरची, १/४ इंच आलं, १ पाकळी लसूण
अर्धी वाटी पेपर जॅक चीज किसून
चिमुट्भर गरम मसाला, १/२ चमचा लिंबाचा रस
क्रमवार मार्गदर्शन:
- बटाटे उकडून, सोलून बाजूला ठेवावे
- बटाटे अंडा करीला अंडी चिरतो तसे अर्धे चिरावे
- बटाट्याचे तुकडे बरोबर मधे कोरावे - कोरलेला बटाटा उकडलेल्या अंड्याचा पिवळा भाग काढल्यावर अंडं दिसतं तसा दिसतो
- उरलेले सर्व जिन्नस मिक्सर मधे वाटून घ्यावे
- बटाट्यामधे जो खड्डा होतो त्यात वरील सारण घालावे
- सर्व बटाटे भरून झाले की त्यावर थोडेसे बटर लावावे
- ओवन ३०० फॅ. ला तापवून घ्यावा
- त्यात हे बटाटे १५-२० मिनिटे बेक करावे.
- वाढताना वरून जीरे पूड टाकावी, चिंचेच्या व हिरव्या तिखट चटणीबरोबर खावे
माहितीचा स्रोत:मूळ कल्पना ऑन लाईन वाचली होती. सोयीनुसार बदल करून वापरली. ते संकेतस्थळ सापडत नाही
अधिक टीपा:
- खाणारे आरोग्य-चिकित्सक नसल्यास बटाटे ओवन मधे न ठेवता, थोड्या तेलात तळावे
- अर्थातच बटाट्यात भरलेले सारण वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल. आवडीनुसार बदल करावे.
- सारणासाठी अजून एक कल्पना मनात आहे - चिरलेला पालक, मके आणि थोडं डाळीचं पीठ असे मिश्रण शिजवून घेतल्यास छान लागेल असे वाटते. पण अजून करून पहायला वेळ झाला नाही. अमेरिकेत साउथ-वेस्टर्न एगरोल्स मधे असंच काहिसं घालत असावेत असं वाटतं.
हे मनोगत वरुण घेतले आहे.