बुधवार, १६ जुलै, २००८

लाल पराठे मन्जुशा मंगळ, २७/०२/२००७ - ०९:२३.

वाढणी:४ जणांकरिता
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ बीट, १ मुळा, ४ वाट्या कणिक , १/४ प्रत्येकी डाळीच पीठ व तांदळाची
पीठी, १ चमचा प्रत्येकी तीळ व ओवा, थोडीशी हळद, १/२ वाटी दही,
चवीनुसार मीठ व तिखट, २ चमचे तेल मोहनासाठी व पराठयाला वरून लावण्यासाठी आपल्या आवडीनुसार
क्रमवार मार्गदर्शन:मुळा व बीट किसून घ्यावे. एका पातेल्यात दोन्ही किस एकत्र २-३ मिनिटं वाफवून घ्यावे.एका परातीत वरील सर्व जिन्नस एकत्र करून घट्ट कणिक भिजवून घ्यावी. १० मिनिटे कणिक मुरल्यावर नेहमी प्रमाणे पराठे करावे.
माहितीचा स्रोत:स्वप्रयोग
अधिक टीपा:मुलं बीट मुळा खात नाही पण अश्याप्रकारे केलेले लाल पराठे आवडीने खातात।
हे मनोगत वरुण घेतले आहे.