मंगळवार, २२ जुलै, २००८

कैरीची डाळ सन्ध्या पिसाल बुध, ०५/०४/२००६ - ११:२१.

वाढणी:४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
मध्यम आकाराची १ कैरी
२ वाट्या हरभरा डाळ [ चार तास भिजवुन - निथळुन]
पाव वाटी ओले खोबरे[बारीक तुकडे]
३-४ हिरव्या मिरच्या,१ चमचा साखर,जीरे , कोथिंबीर चिरलेली पाव वाटी, मीठ चवीनुसार
फोडणी - तेल २ चमचे, १ चमचा मोहरी,हिंग चिमुटभर, कडीपत्ता ५-६ पाने
क्रमवार मार्गदर्शन:
कैरीचे साल काढुन बारीक तुकडे करुन, त्यात डाळ,ओले खोबरे,मिरच्या घालून मिक्सर मधे वाटुन घ्या.
नंतर त्यात साखर, मीठ घाला, परत एकदा मिक्सर लावा . हे मिश्रण जाडे-भरडेच असावे.
फोडणी करताना तेल कडक तापल्यावर त्यात मोहरी,हिंग,कडीपत्ता घालावे. लगेच मिश्रणावर घालावी.
कोथींबीर घालुन मिक्स करा.
वाढण्याआधी थंड करावी.
माहितीचा स्रोत:समर्थ काकु
अधिक टीपा:
कैरी जरा आंबट असावी.
डाळ आणि खोबरे जाडसरच ठेवावे.
पाट्यावरती वाटलेली कैरीची डाळ अजुनच चवदार लागते.
हे मनोगत वरुण घेतले आहे.