शनिवार, २६ जुलै, २००८

मेथीची दाणे लावुन पातळ भाजी (खांदेशी)

कुंदनच्या आग्रहाखातीर....
साहित्य:मेथीची पालेभाजी बारीक चिरलेली - २ वाटीशेंगदाणे - १/२ वाटीहिरवी मिरची - ६ ते ७ (चवीनुसार)लसुण पाकळ्या - ५ ते ६कोथिंबीर - बारीक चिरुन आवडीनुसारफोडणी साठी - जिरे, मोहरीमीठ चवीनुसारतेल
कृती :शेंगदाणे व मिरच्या कढईत थोडे तेल गरम करुन खमंग भाजुन घ्याव्यात. भाजलेल्या मिरच्या, शेंगदाणे , कोथिंबीर, लसुण पाकळ्या, जिरे एकत्र मिक्सरवर बारीक वाटण करुन घ्यावी.कढईत तेल, मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात वरील वाटलेली चटणी घालुन तेल सुटेपर्य॑त परतावे. त्यात मेथीची बारीक चिरलेली भाजी टाकुन २ मिनीटे चांगले परतावे. त्यात रस्स्यासाठी जरुरी प्रमाणे गरम पाणी व मीठ घालुन एक उकळी आणावी. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन गरम गरम पोळी किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
टिप - अशाप्रकारे आपण गवार, वांगी, दोडका, ढेमसे, बटाटा, चवळी, वाल, सांडगा याची भाजी करू शकतो। फक्त भाज्या फोडी करून शिजवून किंवा वाफवुन घ्याव्यात.
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.