मंगळवार, २२ जुलै, २००८

ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का?

ऑफीस मध्ये दुपारचे जेवण झाले की झोप न यायचे काही उपाय ...
(बाहेर जायचा उपाय सांगू नका खुप ऊन असतं॥

खरं सांगू का? कुठलाही उपाय न करता झोपुन जायचे।
ओफिस मधे न जाणे
ऑफीस काय घर बसल्या पगार देणार आहे काय ...?
कळफलक दूर सारून मेजावर प्रकल्पासंबंधीचे बाड ठेवा। हाताचे कोपर मेजावर टेकवा. तळहातावर हनुवटी टेकवून गंभीर पणे प्रकल्पासंबंधीचे कागद वाचत आहात असा आभास निर्माण करा. आणि मग हळूच डुलकी काढा. सुरुवातीला थोडा त्रास होईल. पण हळू हळू सवयीने जमून जाईल.मी असेच करतो ...

१.कंपनी सोडणारा पुढला कोण?ह्य प्रश्नाच उत्तर शोधण्यासठी एक गुप्त हेर एजन्सी सुरु करा.२. तुमच्या बॉस ला "ब्लँक कॉल" करा.३.तुम्ही बसता तिथले फर्निचर पार हल्वुन सोडा.शेजार्‍याच्या खुर्चिशी तो पार चवताळॅ पर्यंत काड्या करा.४.कंटाळा येइस्तोवर, हाता पायाची बोटे आधि सरळ आणि मग उलट क्रमाने मोजा.५.मीटिंग मध्ये फालतु प्रश्न विचारुन त्या लांबवा.६.लोकांचे काम करतान्चे विचित्र हाव भावाचे निरिक्षण करुन, स्वतः ही तस्सेच करण्याचा प्रयत्न करा.७.शिट्ट्या मारत सुटा.८.कॉफी कप बरोअबर कचरापेटीत फेकायचा सराव करा.९. तुमचा पी सी एका वेळेस किती जास्तित जास्त किती ऍप्लिकशन उघडु शकतो हे शोधा.(खुप सार्‍याअ विंडोज् उघडुन)
१०।एखाद्या कडे पाहुन कल्पना करा:-हे कार्ट ५ वर्षाचं असताना कसं असेल?लग्नाच्या वेळेस कसं वेंधळेपणा करेल(केलेला असेल)?११. चाहाच्या वेळेतुन "वर्क ब्रेक्स" घ्या!१२.लोकंचे डोके खात चला.म्हंजे टेंशन त्यांना.आपल्याला नाही.आणि हो.बालिके, हे सर्व करताना काही क्षुद्र तथाकथित "मॅच्युअर्ड" लोक विचित्र पाहतील्.तिकडे साफ दुर्लक्ष कर.शेवटी आपला दिवस चांगला जाने महत्वाचे.काय?