बुधवार, १६ जुलै, २००८

ओल्या काजूची उसळ चौकस मंगळ, २४/०४/२००७ - १३:३७.

वाढणी:दोन जणाना चवीपुरते
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
ओले काजू पाव किलो
एक वाटी नारळ
हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे
तूप
जिरे
कोथिंबीर, मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
ओले (न भाजलेले) काजू कोंकणात सध्या मिळतात. त्यांची साले काढणे हे किचकट असते. परंतु ती पहिली पायरी ओलांडायलाच लागेल.
काजू सोलून घ्यावेत.
खोबरे खवून घ्यावे.
तूप (एक मोठा चमचा) गरम करून घ्यावे. त्यात जिऱ्याची फोडणी करावी. लगेचच हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून ज्योत बारीक करावी.
निम्मे खोबरे घालून चांगले हलवावे व काजू टाकावेत.
दोन ते तीन मिनिटे वाफ आणावी आणि उरलेले खोबरे घालावे. अजून शिजवण्याची गरज वाटली तर झाकण न ठेवताच शिजवावे.
शेवटी मीठ घालून हलवावे आणि कोथिंबीर घालावी.
माहितीचा स्रोत:पारंपारीक
अधिक टीपा:
काजू नीट सोलणे ही पायरी पार केल्याशिवाय या पदार्थाला सुरुवात करण्यात अर्थ नाही. ओल्या काजूच्या सालांना एक उग्र, तुरट चव असते.
ओल्या काजूंना एक चव असते. ती आवडत असेल तरच हा पदार्थ आवडू शकेल. कारण यात इतर काहीही मसाला नाही.
आवडत असल्यास शेवटी लिंबू पिळावे.
याबरोबर तांदळाची भाकरी चांगली लागते.
हे मनोगत वरुण घेतले आहे.