मंगळवार, १५ जुलै, २००८

लाल मेथी-मटर-मलाई रुतुकरन्दिकर बुध, १०/१०/२००७ - १३:५४.

वाढणी:४-५ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ जुड्या मेथी, २ मोठे कांदे, २-३ छोटे डबे टोमेटो प्यूरी.
आलं-लसुण पेस्ट २ चमचे, २-३ वाट्या मटर, १ छोटा डबा मलाई
बटर , २ चमचे तिखट, १ चमचा गरम मसाला, मीठ, साखर, हळद
सजावटी साठी कोथींबीर व थोडी मलाई
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम कांदा आलं-लसूण वाटून घ्यावे . मेथी धुऊन चिरून घ्यावी.
कढई तापत ठेवून बटर घालावे. मग थोडी साखर घालावी. ती लाल झाली की कांदा आलं-लसूण वाटण
घालावे. ५ मी. परतावं, हळद, तिखट घालावे.
मेथी,मटार घालून शिजू द्यावे. टोमॅटो प्यूरी घालावी. परत ५ मि. शिजू द्यावे.
लागेल तसं पाणी घालावे. मीठ, गरम मसाला घालावा.
शेवटी मलई घालून उकळावे.
वाढण्याच्या भांड्या मध्ये काढून, कोथींबीर व मलई ने सजवावे.
माहितीचा स्रोत:माझी बहीण- सौ. वर्षा पटवर्धन
अधिक टीपा:नान व जीरा राईस बरोबर खावे।
हे मनोगत वरुण घेतले आहे.