सोमवार, २१ जुलै, २००८

मुडाखि रोहिणी सोम, ३१/०७/२००६ - २१:५२.

वाढणी:२ जण
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
बासमती तांदुळ १ वाटी, अर्धी वाटी मुगाची डाळ, ३ वाट्या पाणी
१ वाटी गाजर व सिमला मिरचीच्या जाड फोडी
१ वाटी मटार, १ वाटी फ्लॉवरची मोठी फुले
१ वाटी जाड चिरलेला कोबी, ४-५ लसुण पाकळ्या, थोडे आले,
२ मिरच्या, अदपाव कांदा, मीरपूड अर्धा चमचा, मीठ,
मोहरी, हिंग, जिरे, हळद, फोडणीकरता तेल
क्रमवार मार्गदर्शन:
तांदुळ व डाळ पाण्यामध्ये धुवून रोवळीमधे १ तास निथळत ठेवावे. नंतर लसूण, आले, मिरच्या खूप बारीक चिरणे. कांदा बारीक व उभा चिरणे. तेलाच्या फोडणीमधे आले,लसुण,मिरची,कांदा व मिरपूड घालून २-३ मिनिटे गुलाबी रंगावर परतणे. नंतर भाज्या व डाळ तांदुळ घालून परत २-३ मिनिटे परतणे. नंतर या मिश्रणात डाळ तांदुळ प्रमाणाच्या दुप्पट पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून एकसारखे ढवळून शिजवणे. कूकरमधे खिचडी केली तर वाफ धरल्यावर लगेच गॅस बंद करणे.
मुडाखि म्हणजेच मुगाच्या डाळीची खिचडी हे सर्वांना माहिती आहेच.
रोहिणी
माहितीचा स्रोत:स्वानुभव
अधिक टीपा:गरम व तिखट खिचडी खाताना बरोबर थंडगार दही खाणे। खिचडीबरोबर पाहिजे असल्यास टोमॅटो काकडीचे गोल काप, भाजलेला/तळलेला उडदाचा किंवा पोह्याचा पापड, लसणाची चटणी, टोमॅटो सूप/सार किंवा कढी घेणे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.