मंगळवार, २२ जुलै, २००८

कचोरी वैश्री सोम, २४/०४/२००६ - ०२:३९.

वाढणी:९ कचोरी - ४-५ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
मुग डाळ - १ कप
मैदा - १/२ कप
बेसन - ४ चमचे
सोडा, तिखट, मीठ, बडीशेप, काळी मिरि, आले ,हिंग- चवीनुसार
तेल - १/२ कप
क्रमवार मार्गदर्शन:
१. मुग डाळ २-३ तास पाण्यात भिजवावी
२. मैदयात पाणी, तेल मीठ आणि सोडा घालुन सैलसर मळावा
३. मुग डाळ पाणी घालुन वाटुन घ्यावी
४.तेलामध्ये थोडे हिंग घालुन त्यात वाटलेली डाळ घालावी आणि त्यात तिखट, मीठ, बडीशेप, काळी मिरि, आले घालावे
५.वरिल मिश्रणात थोडे बेसन घालुन चांगले हलवावे
६.मैदयाच्या छोट्या पुऱ्या लाटुन त्यात मिश्रण भरावे व हलकेसे लाटावे.
७. तेलामधे तळुन कदावे.

माहितीचा स्रोत:स्वतः
अधिक टीपा:चिंचेच्या चटनी बरोबर वाढावे।
हे मनोगत वरुण घेतले आहे.