सोमवार, २८ जुलै, २००८

कांद्याचे सँडविच

वाढणी:एका भुकेल्या साठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पावाचे स्लाईस ४
बटर
मायोनेझ
कांदा १ मध्यम
काळीमिरी पावडर दोन चिमुट
मीठ चवीनुसार.
क्रमवार मार्गदर्शन:
चारही स्लाईसना दोन्ही बाजूंनी बटर लावून घ्या.
कांदा उभा आणि पातळ चिरून कुस्करून ठेवा.
मध्यम आंचेवर नॉन-स्टीक पॅन ठेवून त्यावर दोन स्लाईस ठेवा. स्लाईस दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर चरचरीत भाजून घ्या. भाजून झाल्यावर खाली काढून ठेवा.
असेच, चारही स्लाईस भाजून झाल्यावर, दोन स्लाईस वर भरपूर मायोनेझ लावा. त्यावर कुस्करलेला कच्चा कांदा पसरुन, चिमुटभर काळीमिरी पावडर भुरभुरून टाका. चवीनुसार मीठ टाका. या दोन स्लाईस वर आता उरलेले दोन स्लाईस ठेवून सँडवीचच्या कडा धारदार सुरीने कापून घ्या. सँडविचचे दोन त्रिकोणात भाग करून गरमगरम असतानाच खा.
शुभेच्छा...!
अधिक टीपा:
हे सँडविच गरम असतानाच खाण्यात मजा आहे.
या बरोबर टोमॅटो सॉस वगैरे घ्यायचा नाही. बटर, मायोनेझ आणि कच्चा कांदा यांची एकत्रीत चव मारली जाता कामा नये.
कच्चा कांदा आवडणाऱ्यांसाठी बेस्ट सँडविच.
हे मनोगत वरुण घेतले आहे.