बुधवार, १६ जुलै, २००८

जिंजर मॅजिक उर्फ आल्याचा केक मोगॅम्बो गुरु, ०८/०२/२००७ - १७:५२.

वाढणी:घरातील सर्वांना
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
३ कप जरा जाडसर कणीक
१ कप पाणी
१ कप बारीक चिरलेला गूळ
१ कप साखर
१ कप साजुक तूप किंवा लोणी
मीठ आणि सोडा प्रत्येकी पाउण टी स्पून
अर्धा टी स्पून बेकिंग पावडर
२ टेबल स्पून आल्याची पेस्ट
क्रमवार मार्गदर्शन:
लोणी किंवा तूप पातेल्यात घेऊन त्यावर १ कप उकळते पाणी ओतावे. त्यात गूळ व साखर घालून विरघळवा. नंतर आल्याची पेस्ट टाका. कणकेत मीठ, सोडा, बेकिंग पावडर घालून चाळून घ्यावे. पातेल्यातील मिश्रणात ही कणीक थोडी थोडी घालून हलवावे. मिश्रण घट्ट वाटल्यास थोडे दूध घाला व मिश्रण उबदार जागेत ४ तास ठेवावे. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात वरील मिश्रण ओता व ओव्हनमधे १५० अंश डिग्री सेंटी. वर अर्धा तास ठेवावे.
टीप: मैदा व वनस्पती तूप असलेला केक आरोग्याला उपकारक नसतो. म्हणून कणीक व साजुक तूप घातलेला हा केक पौष्टिक आहे. आल्याची चव असल्यामुळे पावसाळी किंवा हिवळी वातावरणात हा केक गरमगरम खाणे यात वेगळाच आनंद आहे.
माहितीचा स्रोत:योगिता बी पाटील, यांची लोकमत सखी स्पर्धेतील बक्षीसपात्र कृती
अधिक टीपा:मी हा केक करताना सर्व प्रमाण अर्धे घेतले आणि मूळ कृतीत लिहिलेल्या प्रमाणे १६० अंशावर बेक केला। पण त्यामुळे तो वरून थोडा जळाला. पण झाला अत्यंत अप्रतीम. म्हणून कृतीमधे मी १५० अंश लिहिले आहे. तरी बेक करताना लक्ष ठेवावे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.